मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काही अधिकारच नसतो !, CM फडणवीसांच्या टोलेबाजीने मंत्रिमंडळात अस्वस्थता
मुंबई: मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काहीच अधिकार नसतो. आपणही उपमुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अधिकारातच काम करीत होतो. कोणी काही वक्तव्ये केली हे माहिती नाही. पण त्या मंत्र्यांचे पुरावे द्या, लगेच त्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवतो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या टोलेबाजीला मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली असतानाच सत्ताधारी सदस्यांनी मात्र जोरदार बाके वाजवत दाद दिली.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी टिपू सुलतान, औरंगजेबच्या उदात्तीकरणावरुन काँग्रेसला तर हिन्दी सक्तीच्या मुद्यावरुन ठाकरे बंधूना खडेबोल सुनावले. तसेच आपल्या मित्र पक्षांनाही सरकारमध्ये सर्वकाही आपणच आहोत याची जाणीव करुन दिली. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना ही सुुरु करतानाच त्यात समावेश होणाऱ्यांचा कालावधी हा ११ महिन्यांसाठी असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
पण सरकारमधील एका ज्येष्ट मंत्र्याने या तरुणांना सेवेत कायम करू, असे जाहीरपणे आश्वासान दिले होते याकडे शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले होते. त्यावर ज्या मंत्र्यांनी या योजनेतील तरुणांना कायम नोकरीचे आश्वासन दिले होते, त्याचे पुरावे द्या, लगेच त्या मंत्र्यांचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना दिलेला हा टोला असल्याची कुजबूज मग सुरू झाली. कारण शिंदे यांनी तसे आश्वासन दिले होते, असे भास्कर जाधव यांनी लक्षात आणून दिले होते.टिपू सुलतान चांगला होता की वाईट याला आमचा आक्षेप नाही. पण ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी तुलना करण्यास आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. देशात काँग्रेस सरकारच्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या(एनसीईआरटी) पु्स्तकात १७ पाने मुघलांच्या इतिहासावर तर एक परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर होता. आता या पुस्तकांमध्ये महाराजांच्या इतिहास सांगणारी तब्बल २० पाने आहेत. देशाचा इतिहास योग्य पद्धतीने शिकविला गेला असता तर या देशातील एकही मुसलमानाने औंरगजेबला हिरो मानला नसता, असे मत मांडला.नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनावरी खर्चावरुन टीका करणाऱ्या विरोधकाना, कुंभमेळ्यास तुमचा एवढा विरोध का, हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा असतो. प्रयागराजच्या कुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशला मोठा आर्थिक फायदा झाला असून नाशिक कुंभमेळामुळे जगात महाराष्ट्राचे ब्रँडींग होईल असा दावाही फडणवीस यांनी केला.सक्ती फक्त मराठीचीच राज्यात गेले वर्षभर चर्चेत राहिलेल्या आणि डोकेदुखी ठरलेल्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावरुनही फडणवीस यांनी पुन्हा एखदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच दोष दिला. पहिली ते १२वीपर्यंत हिन्ही सक्तीचा निर्णय ठाकरे सरकारचा आहे. कोणत्याही समितीचा अहवाल स्वीकारुन त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाचा असतो.
मंत्रिमंडळ
बैठकीत मुख्यमंत्र्यासमोर अन्य मंत्र्याना काही अधिकारच नसतो. त्यामुळे
हिन्दी सक्तीचा निर्णय मंत्रिमंळाचा असला तरी त्यावर स्वाक्षरी ठाकरे
यांचीच आहे, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीचा
दस्तावेज आदित्य ठाकरे यांच्यासमोर फडकवत आपण ही सही कोणाची हे नक्कीच ओळखत
असाल असे खोचरपणे सांगितले. हिंदी सक्तीच्या निर्णयाचे खापर आपल्यावर
फोडले जात असले तरी आपल्यामुळेच ठाकरे बूंधू एकत्र आले. राज्यात हिंदी
सक्ती करण्याची मान्यता उद्धव ठाकरेंनी दिली, मात्र आमच्या राज्यात सक्ती
फक्त मराठीचीच असा टोलाही त्यांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.