Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुमार ज्वेलर्सवर दरोडा, टोळीने आले एका मिनिटात 16 कोटी केले लंपास

कुमार ज्वेलर्सवर दरोडा, टोळीने आले एका मिनिटात 16 कोटी केले लंपास


कॅलिफोर्निया: हॉलिवूड चित्रपटातील दृश्यासारखी एक धाडसी चोरीची घटना अमेरिकेत घडली. मुखवटे घातलेल्या चोरट्यांच्या टोळीने कुमार ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात धाड टाकत अवघ्या एका मिनिटात सुमारे 15.7 कोटी रुपये (1.7 दशलक्ष डॉलर) किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना फ्रीमॉन्ट कॅलिफोर्निया येथे घडली होती. हे दुकान एका भारतीय-अमेरिकन कुटुंबाचे आहे.

अमेरिकेच्या न्याय विभाग कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, चोरट्यांनी दुकानात घुसून अतिशय वेगाने काचांच्या कपाटांची तोडफोड केली आणि मौल्यवान दागिने पळवले. ही घटना गेल्या वर्षी 18 जून रोजी घडली होती. या दरोड्यात दुकानातील सुमारे 75 ते 80 टक्के माल चोरीला गेला. पोलिसांनी पाठलाग करून चार संशयितांना अटक केली असली तरी या टोळीतील बहुतांश आरोपी अजूनही फरार आहेत.

हातोडे, पिक्स आणि बॅग घेऊन केलेला हल्ला
दरोडेखोरांच्या हातात पिक्स, हातोडे आणि पाठीवर बॅकपॅक होते. त्यांनी अतिशय वेगाने काचांचे शोकेस फोडले आणि त्यातील सोने-हिर्‍यांचे दागिने बॅगमध्ये भरले. त्यानंतर आरोपी वेगवेगळ्या दिशांनी पळून गेले. ते चोरीच्या कारमध्ये फरार झाल्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे अधिक कठीण झाले. New York Post च्या अहवालानुसार या कार चोरीच्या असल्यामुळे पोलिसांच्या नंबर प्लेट रीडर प्रणालीद्वारे आरोपींचा शोध लावणे शक्य झाले नाही.
पोलिसांचा पाठलाग

फेडरल सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, पोलिसांना कोणत्या कारचा पाठलाग करायचा हे ठरवावे लागले. शेवटी त्यांनी काळ्या रंगाच्या Acura कारचा पाठलाग सुरू ठेवला. ही कार फ्रीमाँटमधील अनेक निवासी भागातून वेगाने पळत होती. पाठलागादरम्यान त्या कारने अनेक वाहनांना चुकीच्या बाजूने ओलांडले, अनेक चौकांवर थांबण्याच्या सिग्नलचे उल्लंघन केले आणि सुमारे 80 मैल प्रति तास वेगाने वेगवेगळ्या लेनमध्ये झिगझॅग पद्धतीने धावत राहिली.

सोशल मीडियावर चर्चा
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी अमेरिकेत अशा प्रकारच्या "स्मॅश अँड ग्रॅब" चोरीच्या घटना वाढत असल्याचे सांगितले. मोठ्या संख्येने टोळ्या दुकानांवर हल्ला करून माल लुटत असल्याचे लोकांचे मत आहे.

एका युझर्सने लिहिले की आता अशा प्रकारच्या जमावाने केलेल्या कारवाया सामान्य झाल्या आहेत. पूर्वी तीन-पाच जणांच्या टोळ्या असायच्या, पण आता संपूर्ण जमाव दुकानांवर हल्ला करताना दिसतो. दुसऱ्या युझर्सने म्हटले आहे की, या घटना वारंवार घडत आहेत कारण आरोपींना कठोर शिक्षा होत नाही. अमेरिकेसारख्या समृद्ध देशात असे घडू शकते, तर ते कुठेही घडू शकते. त्यामुळे स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.