Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! कोरानानंतर आता पुन्हा लागणार मोठं लॉकडाऊन? जगभऱात अशी सुरू आहे पूर्वतयारी

Big Breaking! कोरानानंतर आता पुन्हा लागणार मोठं लॉकडाऊन? जगभऱात अशी सुरू आहे पूर्वतयारी


अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धानं आता भीषण रूप धारण केलं आहे. युद्धाला सुरुवात होऊन २३ दिवस लोटत आले तरी शांतता प्र्स्थापित होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही आहेत. त्यातच इराणने जगभरातील इंधन वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागा आहे. खनिज तेलाच्या किमती ११२ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. 

अमेरिकेत तर गॅसच्या किमती ५ डॉलर प्रति गॅलनपर्यंत पोहोचल्या आहेत. वाहतुकीचा खर्च वाढल्याने प्रत्केक गोष्ट महाग होत चालली आहे. तसेच इंधनाचा तुटवडा आणि महागाईमुळे या संकटावर मात करण्यासाठी जगभरात लॉकडाऊन लावावं लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धामुळे सध्या दुकानांमध्ये सारं काही महाग होत चाललं आहे. पिकांसाठी आवश्यक असणारी खतेही आखातामधून येत असल्याने अन्नसुरक्षाही धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना खतांसाठी अधिक पैसे मोजावे लागले तर अन्नपदार्थही महाग होण्याची शक्यता आहे.

या युद्धाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका हवाई वाहतुकीलाही बसत आहे. त्यामुळेच युनायटेड एअरलाइन्सने या आठवड्यात ५ टक्के उड्डाणांमध्ये कपात केली आहे. इतर देशांमधील विमान कंपन्या देखील उड्डाणांमध्ये कपात करत आहेत. आवश्यक नसल्यास विमान प्रवास करू नका, असे सरकारांकडून सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारची आवाहनं कोरोनाच्या काळात सुरुवातीला करण्यात आली होती. तसेच नंतर लॉकडाऊन लावण्यात आलं होतं.
इंधन टंचाईमुळेअनेक देशांत तेलाचं रेशनिंग करण्यात येत आहे. जपानमध्ये तेलाचं रेशनिंग सुरू करण्यात आलं आहे. बांगलादेश, फिलीपाईन्स आणि श्रीलंकेमध्ये पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने अनावश्यक प्रवास टाण्याचं आवाहन केलं आहे. भारतामध्येही ८० टक्के तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून येतं. तिकडे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आता तेलाच्या टंचाईने अधिकच अडचणीत आणले आहे.

यादरम्यान, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने इंधन दरवाढीच्या संकटापासून सुरक्षा या नावाने दहा कलमी योजना प्रसिद्ध केली आहे. यामधून विविध देशांच्या सरकारांना वाहनं चालवण्यासाठी नंबर प्लेटच्या आधारावर दिवस निश्चित करण्याचे, प्रत्येक महामार्गावर वेगमर्यादा कमी करण्याचे, विमान प्रवास शक्यतो टाळण्याचे.गॅस ऐवजी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करण्याचे,तसेच शक्य असल्यास घरातूनच काम करण्याचे आवाहन केले आहे.
आता इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध आणखी काही काळ चाललं आणि तेलाच्या किमती वाढल्या तर वाहतूक, उड्डाणे, शेती सारं काही महाग होईल. आता विविध देशातील सरकारांकडून इंधनाचं रेशनिंग आणि वेगमर्यादा लागू केली जाईल. आयईएची योजना विविध देशात लागू केली जाईळ. तसेच डिजिटल परमिट सिस्टिम ही कायमस्वरूपी व्यवस्था बनू शकते. तसेच त्यामध्ये तुमची गाडी, प्रवास आणि घरगुती उपकरणं नियंत्रित होईल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.