Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : अग्निशमन अधिकारी सुनील माळींवरील हल्ला प्रकरणाचा छडा; दोन संशयितांना अटक, धक्कादायक कारण समोर

सांगली : अग्निशमन अधिकारी सुनील माळींवरील हल्ला प्रकरणाचा छडा; दोन संशयितांना अटक, धक्कादायक कारण समोर



सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनिल माळी यांच्यावर खुनी हल्ला करण्यासाठी सहा लाखांची सुपारी देणाऱ्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. 
मलिक सलीम शेख (रा. राजावत कॉलणी दत्तनगर बामणोळी ता. मिरज), अभिजित अनिलकुमार चव्हाण (रा. कमला निवास राम मंदीर चौक सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 27 जानेवारी रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर त्यांच्या घराजवळच खुनी हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी यापूर्वी प्रथमेश पाटोळे, तोहीद ऊर्फ हुसेन सुतार यांना अटक केली होती. आता मलिक शेख, अभिजित चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य एक संशयित डी. माया ऊर्फ शुभम आनंदा पारचे (रा. चाणक्य चौक) याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

अभिजित चव्हाण यांचे रसिका मार्केटीग सांगली व जीएलसी ग्रुप ऑफ फायर अॅण्ड सेफ्टी इंजीनियर्स, सांगली हे दोन्ही फर्म आहेत. मुख्य अग्निशामक अधिकारी सुनिल माळी यांनी फर्मचे लायसन्स मुदतीमध्ये खाडाखोड केलेबाबत तसेच जीएलसी ग्रुप ऑफ फायर अॅण्ड सेफ्टी इंजीनियर्स, सांगली हे दोन्ही फर्म आरोपी नामे अभिजित अनिलकुमार चव्हाण चालवित असल्याने सदर फर्म ब्लैक लिस्ट केले होते. यांचा राग मनात धरुन अभिजित चव्हाण यांने मलीक सलीम शेख याला मुख्य माळी यांच्यावर खुनी हल्ला करण्यासाठी सहा लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर मलिक याने सुतार आणि पाटोळे यांना माळी यांच्यावर हल्ला करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी हल्ला केला होता.
पाटोळे आणि सुतार यांना अटक केल्यानंतर चव्हाण याने माळी यांना मारण्याची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले. शहर पोलीस चव्हाण आणि मलिक यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे यांना दोघेही संशयित कोल्हापूर रस्त्यावरील फळ मार्केटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर होळकर, संदिप पाटील, सतीश लिंबळे, विनायकशिंदे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, दिग्विजय साळुंखे, शंकर रणधीर, योगेश हाक्के, योगेश सटाले, संदीप कोळी, गणेश कोळेकर, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.