Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके

अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके



सोलापूर : अजित पवारांच्या  निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू असताना त्यामध्ये आता ट्विस्ट आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके  यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय.
आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
बारामतीत जाऊन निवडणुकीसंदर्भात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. कार्यकर्त्यांसोबत व्यापक बैठक घेऊन निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं.

आमचे प्रश्न सोडवले नाहीत
लक्ष्मण हाके म्हणाले की, "बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेलं अहिल्यादेवींचं नाव बदलण्याचा जीआर हे शासन काढू शकतं, आम्ही ते कधीही सहन करणार नाही. ओबीसींचे कोणतेच प्रश्न स्वर्गीय अजितदादा किंवा या सरकारने सोडवले नाहीत, आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असेल किंवा होस्टेल असेल असे अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो मात्र त्याला न्याय कधीच मिळाला नाही."
आम्हीच दुःख का व्यक्त करायचं?

लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे चुकीचं आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा, नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचे का? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला.

आमच्या ओबीसी समाजाचे आरक्षण एका बाजूला संपवून टाकण्यात आलं आहे. आमचे सर्व प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. अशावेळी अन्यायाला वाचा फोडायला निवडणुकीसारखा दुसरा कोणता पर्याय आहे का? असा सवाल हाके यांनी केला. सुप्रिया सुळे जर प्रोफेशनल राजकारण करत असतील तर आम्हीही तसे करू असंही हाके म्हणाले.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.