Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारत-इंग्लंड सेमी फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार मुंबईतील माजी क्रिकेटपटूला अटक

भारत-इंग्लंड सेमी फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार मुंबईतील माजी क्रिकेटपटूला अटक


टी-20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडिययममध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्याच्या तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे. या प्रकरणात मुंबई अंडर-19 संघासाठी खेळलेला बलवंत सिंह उर्फ स्वरूप सिंह सोढा (वय 26) याला सातवा आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोढा याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून तिकिटांच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या काळाबाजार रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 24 तिकिटे जप्त केली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र पाठवून तिकिटांचे वाटप कसे करण्यात आले याबाबत माहिती मागवली आहे. तपासात उघड झाले की, सोढा याने 25 हजार रुपयांना दोन तिकिटांची विक्री केली होती. मात्र त्याला ही तिकिटे कशी मिळाली, याबाबत त्याने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.
पोलिसांनी सोढा विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 318 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोढा 2019 मध्ये मुंबई अंडर-19 संघाकडून खेळला होता आणि त्यानंतर तो प्रशिक्षक (कोच) म्हणून काम करू लागला होता. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंसोबत त्याने क्रिकेट खेळल्याचेही पोलिसांनी सांगितले. स्वतःच्या ओळखीचा वापर करून सोढा काळाबाजाराच्या रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.