Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खानापूरमध्ये सभापतीपदी शिंदेसेनेच्या सुवर्णा भोसले यांची बिनविरोध निवड

खानापूरमध्ये सभापतीपदी शिंदेसेनेच्या सुवर्णा भोसले यांची बिनविरोध निवड


विटा : खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदेसेनेच्या सुवर्णा प्रशांत भोसले यांची तर उपसभापती पदी सुहास (नाना) मालोजीराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे सर्व आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

खानापूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षित होते. मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीची विशेष सभा अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव तथा गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्या उपस्थितीत झाली.


यावेळी सभापती पदासाठी नागेवाडी पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या शिंदेसेनेच्या सुवर्णा प्रशांत भोसले तर उपसभापती पदासाठी बलवडी (खा.) गणातून विजयी झालेले सुहास (नाना) शिंदे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी जाहीर केले.

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला. नूतन सभापती व उपसभापती यांचा उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य महेश घोरपडे, रोशन जाधव, प्रतिभा शेंडे, पायल कदम, तेजश्री लोखंडे, पांडुरंग खोत, गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.