आमदार कोरेंचं नशीब फळफळलं,'पन्हाळा' हातातून निसटल्यानंतर 'शाहूवाडी'त मारली बाजी, ईश्वर चिठ्ठीवर झाला सभापती



पन्हाळा पंचायत समिती हातातून निसटल्यानंतर शाहूवाडी पंचायत समितीवर पक्षीय बलाबल समांतर असल्याने चिठ्ठीवर काढण्यात आलेल्या सभापती पदावर 'जनसुराज्य'ने बाजी मारली आहे. शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे जनसुराज्य पक्षाला मिळाली. सभापतीपदी प्रियांका भोसले यांची तर उपसभापतीपदी अमरसिंह खोत यांची निवड झाली. 'जनसुराज्य'चे आमदार डॉ.विनय कोरे व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांची युती येथे आहे. 

येथील पंचायत समितीत कोरे गायकवाड यतीकडे ४ तर विरोधी ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील राष्ट्रवादी आघाडी कडे ४ असे समान बलाबल आहे.त्यामूळे सभापती व उपसभापती निवडीत दोन्ही बाजूने समान मते झाल्याने सभापती व उपसभापती ह्या दोन्ही निवडी चिठ्ठया काढून झाल्या.त्यात जनसुराज्य काँग्रेस युतीला संधी मिळाली.यावेळी दोन्ही बाजूचे सर्व सदस्य उपस्थित होते.


गगनबावडा पंचायत समितीच्‍या सभापतीपदी आज अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्‍या छाया प्रकाश देसाई यांची तर उपसभापतीपदी राजेश भगवान पाटील यांची बिनविरोध निवड झाली. दोन्‍ही पदांसाठी प्रत्‍येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्‍याने निवडी बिनविरोध झाल्‍याचे निवडणुक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी जाहीर केले.

राधानगरी पंचायत समितीवर सहा विरुद्ध चार मताने काँग्रेसचे आर. वाय . पाटील सभापती व अश्विनी चौगले उपसभापती यांची निवड झाली. भुदरगड पंचायत समिती सभापती शिंदे सेनेचे विक्रमसिंह पाटील तर उपसभापतीपदी अरुणा देसाई यांची बिनविरोध निवड झाली.

करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी साताप्पा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर उपसभापती भाजपच्या दिपाली पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार व रविवारचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी होते. करवीर पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपची जोरदार एंट्री केली असून काँग्रेस सत्ते बाहेर पडली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.