Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार



इराण-इस्रायल युद्धाची आग आता भारताच्या खिशापर्यन्त पोहोचली आहे. १ एप्रिलपासून अनेक रोजच्या वस्तू आणि मोठ्या खरेदीच्या वस्तू महाग होणार आहेत. LPG संकट तर काहीच नाही, असं म्हणायला सुरुवात झाली आहे, कारण खरा बॉम्ब अजून फुटायचा आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमुळे प्लास्टिक, पॉलिमर आणि इतर कच्च्या मालाच्या किमती २५% पर्यंत वाढल्या आहेत

इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती भागात तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर झाला. कच्च्या तेलाच्या डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे प्लास्टिक, पॉलिमर, रेझिन यांच्या किमती झपाट्याने वाढल्या. आंतरराष्ट्रीय शिपिंग खर्च ७-१०% ने वाढला आहे. शिवाय, रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झाल्याने आयात महाग झाली. याचा फटका भारतात उत्पादित होणाऱ्या अनेक वस्तूंना बसणार आहे.
कार, दुचाकी, टीव्ही, फ्रीज, एसी यांसारख्या वस्तूंच्या किमती ५-६% ने वाढू शकतात. ऑटो कंपन्या २-३% किमती वाढवण्याची तयारी करत आहेत. मर्सिडीज-बेंझ आणि ऑडी यांनी १ एप्रिलपासून २% किमती वाढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. इतर मोठ्या कंपन्या देखील नवीन किंमती ठरवत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी उपकरणांमध्ये प्लास्टिकचे भाग खूप असतात. त्यामुळे टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर यांच्या किमती ५-६% ने वाढण्याची शक्यता आहे. गोदरेज एंटरप्रायझेससारख्या कंपन्यांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढल्या असून एप्रिलपासून ५-६% किंमत वाढ धक्कादायक आहे.

शूज, कपडे आणि रंगही महाग होणार! सिंथेटिक फायबर आणि पेंट्समध्ये पॉलिमरचा वापर होतो. त्यामुळे या वस्तूंच्या किमती ९-१०% ने वाढू शकतात. वुडलँड इंडियासारख्या कंपनीने ८-१२% वाढीची शक्यता वर्तवली आहे. बर्जर पेंट्सनेही ५% किंमत वाढ जाहीर केली आहे. उद्योगातील तज्ज्ञ सांगतात की, पुरवठा साखळीतील अनिश्चितता आणि इनपुट खर्च वाढल्याने कंपन्यांकडे किंमत वाढवण्याशिवाय पर्याय नाही.
मार्चमध्ये विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी काही कंपन्या किंमत वाढ टाळत आहेत पण एप्रिलपासून ही आग खिशात पोहोचेल. रोजच्या आयुष्यातील अनेक वस्तू महाग होणार आहेत. ग्राहकांना आता बजेट काळजीपूर्वक करावे लागेल. ही युद्धाची आग फक्त तेलातच नाही तर आपल्या घराघरात पोहोचली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.