Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत थरार! मध्यरात्री बसवलेला संभाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवला; आता चर्चेतून ठरणार जागा


  • सांगलीत थरार! मध्यरात्री बसवलेला संभाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवला; आता चर्चेतून ठरणार जागा


सांगली मधील राम मंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री बसवण्यात आला. शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनानी पुतळ्यासाठी महापालिकेने निश्चित केलेली जागा मान्य नसल्याने हा पुतळा राम मंदिर चौकात बसवल्याचे शिवतेज सावंत यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून परवानगी घेऊन पुतळा बसवण्याची पोलिसांची हिंदुत्ववादी संघटनेला विनंती केली. नंतर पुतळा पोलिसांनी चबुतऱ्यावरून उतरवला.

सांगली मधील राम मंदिर चौकामध्ये बसवलेला छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा चौथऱ्यावरून खाली घेतला. पुतळा बसवण्याची मागणी असलेल्याची महापालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन पुतळा बसवण्याबाबतची जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या हा पुतळा राम मंदिर चौकातून नेत पोलीस संरक्षणात ठेवण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने महापालिका प्रशासन आणि संभाजी महाराज प्रेमींच्या मध्ये पुतळा बसवण्याबाबतच्या जागेवरून चर्चा सुरू करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनानं छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवायला परवानगी दिली आहे. मात्र हा पुतळा सांगली शहराच्या मुख्य चौकातच बसेल अशी छत्रपती संभाजी महाराज प्रेमींची मागणी केली आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नाही असे लक्षात आल्याने हा पुतळा मध्यरात्री राम मंदिर चौकामध्ये बसवला गेल्याचे शिवतेज सावंत यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.