मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने आज एका शासन आदेशाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (DMER) संचालक पदाच्या जबाबदारीत तात्पुरता फेरबदल केला आहे. आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ. अजय चंदनवाले हे ३१ जानेवारी २०२६ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर, शासनाच्या पुढील आदेशापर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
आज, ८ मे २०२६ रोजी कक्ष अधिकारी प्रविण कांदे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रशासकीय कारणास्तव या कार्यभारात बदल करण्यात आला आहे. डॉ. पल्लवी सापळे, सह संचालक (वैद्यकीय), वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई.डॉ.पल्लवी सापळे यांना त्यांच्या सध्याच्या 'सह संचालक' पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांभाळून 'संचालक' पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागणार आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील.
हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने काढण्यात आला असून, याची प्रत मुख्यमंत्री सचिवालय, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे कार्यालय आणि संबंधित विभागांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. डॉ. सापळे यांनी आयुक्त, वैद्यकीय शिक्षण यांच्यामार्फत हा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सांगली दर्पण परिवाराकडून अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.