Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"मुंबईच्या गर्दीत हरवलेलं बापाचं स्वप्न! मेडिकलचा अभ्यास करणारा पोटचा गोळा रस्त्यावर भीक मागताना दिसला, तेव्हा..."

​"मुंबईच्या गर्दीत हरवलेलं बापाचं स्वप्न! मेडिकलचा अभ्यास करणारा पोटचा गोळा रस्त्यावर भीक मागताना दिसला, तेव्हा..."


मुंबईत सिग्नलवर किंवा फुटपाथवर अनेक गरीब व्यक्ती बसलेलं पाहायला मिळतात. सिग्नलवर गाडी थांबताच ही व्यक्ती पैसे मागण्यासाठी पुढे येतात. मात्र मालाड पोलिसांच्या एका टीमने जेव्हा रस्त्याच्या शेजारी बसलेल्या एका तरुणाला पाहिलं तर त्यांना धक्काच बसला. ते त्याला आपल्या सोबत घेऊय गेले. पोलिसांनी घेतलेल्या या एका निर्णयामुळे एक पोलीस ठाण्यात एक भावनिक क्षण निर्माण झाला.

पोलिसांकडून विशेष अभियान...
मालाड पोलीस रस्त्यावरील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी अभियान राबववित आहे. यादरम्यान एसव्ही रोडवरील फुटपाथवर बसलेल्या एका २२ वर्षीय तरुणावर कॉन्स्टेबल कोमलसिंह जाधव यांची नजर पडली. तरुणाची मानसिक स्थिती बरी नव्हती. तो प्रचंड घाबरलेला दिसत होता. तो कोणत्याही सामान्य प्रश्नाचं नीट उत्तरही देऊ शकत नव्हता. त्याची अवस्था पाहून पोलीस त्याला ठाण्यात घेऊन आले.
तरुणाने सांगितलं त्याच्यासोबत घडलेला प्रकार...

मालाड पोलिसांनी तरुणाला गरम पाण्याने आंघोळ घातली. यानंतर त्याला जेवण दिलं आणि आराम करायला सांगितलं. यानंतर तरुण पोलिसांनी बोलू लागला. हळूहळू तरुणाने आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली. त्याचं नाव अभय आहे, तो नांदेड जिल्ह्यातील तामसाचा राहणारा आहे.

- पहाटे 5 ची वेळ, डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये 100 पोलिसांची गस्त; अखेर 'तो' सापडला, नेमकं काय आहे प्रकरण?

मेडिकलचं घेत होता शिक्षण...
तरुणाने सांगितलं की, तो होमियोपॅथी कॉलेजमध्ये तृतीय वर्षाला शिकत होता. याच वर्षी प्रवासादरम्यान त्याची बॅग चोरीला गेली. या बॅगेत कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रं होती. त्याच्याकडील पैसे संपले होते. मोबाइल नव्हता. अभय आधीपासून मानसिक आजाराचा सामना करीत होता. अशा स्थितीत त्याला घराचा नंबरही आठवत नव्हता. तो सैरभैर झाला होता. तो मुंबईच्या रस्त्यांवर भटकत राहिला आणि शेवटी पोट भरण्यासाठी भीक मागू लागला.
पोलिसांकडून वडिलांना फोन केला अन्...

अभयची कहाणी ऐकताच सब-इन्स्पेक्टर मनीषा कागलकर यांनी इतर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. तपासात, अभय बेपत्ता झाल्याची तक्रार याआधीच दाखल करण्यात आली होती. त्याचं कुटुंब अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होतं. पोलिसांनी अभयच्या वडिलांना फोन केला तर त्यांचा आवाज जड झाला. आपला मुलगा जिवंत आहे, यावर त्यांचा विश्वासच बसेना. पुढील काही तासात अभयचे वडील त्याला घेऊन जाण्यासाठी मालाडच्या पोलीस ठाण्यात पोहोचले. लेकाला मिठी मारून ते ढसाढसा रडू लागले. तो क्षण पाहून पोलिसांच्याही डोळ्यात पाणी तरळलं. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.