Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हादरला! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं

महाराष्ट्र हादरला! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं


धुळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्नाला विरोध केल्यामुळे मुलाने आईची हत्या केली. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून तरुणाने आईला पेटवून दिलं. या घटनेत आईचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. आई लग्नामध्ये बाधा बनत असल्याच्या संशयातून तरुणाने हे भयंकर कृत्य केले. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यामध्ये मुलानेच आपल्या आईला जिवंत पेटवून देत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना धुळे तालुक्यातील महिंदळे या ठिकाणी घडली. आरोपी मुलाने आपल्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर तिला आपल्या रिक्षातून घेऊन जात जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्याचा बनाव केला.याठिकाणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. 

आईने स्वतःहून पेटल्याचा बनाव आरोपी मुलाने केला होता. पण पोलिस तपासातून त्याने हत्या केल्याचे उघड झाले. जिजाबाई भटू खैरनार (६५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रदीप खैरनार (वय ४५ वर्षे) असे आरोपी मुलाचे नाव आहे.पोलिसांनी प्रदीपची कसून चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलाच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत. आई आपल्या विवाहात बाधा घालत असल्याचा संशयातून या मुलाने दारूच्या नशेमध्ये हे कृत्य केले असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. मुलांनीच आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळून तिची हत्या केल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे महिंदळे शिवारामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.