Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! तुकाराम मुंढेंची तडकाफडकी बदली; चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सूत्रे!

धक्कादायक! तुकाराम मुंढेंची तडकाफडकी बदली; चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सूत्रे!


प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा आपल्या धडक कारवायांमुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्यांनी राज्यभरात भेसळीविरोधात कडक कारवाई सुरु केली असून, यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. भेसळ करणाऱ्यांनी कारवाईचा धसका घेतला असून, खराब झालेला माल भीतीपोटी रस्त्यावर फेकून देत आहेत. यारम्यान तुकाराम मुंढे यांची एका पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी?

धडक कारवायांमुळे चर्चेत असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची एका महत्त्वाच्या पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांच्या जागी या पदासाठी चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे मंत्रालयात सचिव असताना त्यांच्यावरती परभणीचे पालक सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता तुकाराम मुंढे सचिव नाहीत. त्यांच्या जागी चंद्रकांत पुलकुंडवार यांना पालक सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पुलकुंडवार हे ग्रामविकास विभागाचे सचिव आहेत.

पालक सचिवाचं काम काय?

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात पालक सचिवाची नियुक्ती केली आहे. प्रशासकीय सोयीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे पालक सचिव राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात, तसंच पालकमंत्र्यांना मदत करतात. जिल्ह्यातील प्रश्न शासन दरबारी सोडवण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. यानुसारच तुकाराम मुंढे यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव होते. दिव्यांग विभागातून बदली झाल्यानंतर आता या पदावरुनही त्यांना हटवण्यात आलं आहे.
- अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, राज्यभरातील 21 आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाच्या धाडी

* प्रतिबंधित गुटखा, पानमसाला साठ्यावर मोठी कारवाई

* 7 लाख 43 हजार 117 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त

* विक्री, वितरण आणि वाहतुकीप्रकरणी 17 जणांना अटक

* कारवाईदरम्यान 3 वाहनेही जप्त

* राज्यभरात 12 एफआयआर दाखल

* 7 आस्थापना सील करण्यात आल्या

* बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक 13 आस्थापनांची तपासणी

* बृहन्मुंबईत 8 जणांना अटक, 1 लाख रुपयांहून अधिक माल जप्त

* नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहने जप्त

* आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार कारवाई

* प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा
मुंबई

* 13 आस्थापनांची तपासणी
* 8 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले
* ₹1,00,417 चा माल जप्त
* 8 जणांना अटक
* 5 आस्थापना सील

कोकण
* 1 आस्थापनेवर कारवाई
* ₹1,32,970 चा माल जप्त
* 1 जण अटक
पुणे

* 1 आस्थापनेवर कारवाई
* ₹2,565 चा माल जप्त
* 1 जण अटक
* 1 आस्थापना सील

नाशिक
* ₹1,64,434 चा माल जप्त
* 1 जण अटक
* 1 वाहन जप्त
छत्रपती संभाजीनगर

* 2 आस्थापनांवर कारवाई
* ₹1,24,080 चा माल जप्त
* 3 जण अटक
* 1 आस्थापना सील
* 1 वाहन जप्त

नागपूर
* ₹1,91,445 चा माल जप्त
* 1 जण अटक
* 1 वाहन जप्त
अमरावती

* 2 आस्थापनांवर कारवाई
* ₹27,206 चा माल जप्त
* 2 जण अटक

एकूण कारवाई
* 21 आस्थापनांची तपासणी
* 16 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले
* ₹7,43,117 चा माल जप्त
* 17 जणांना अटक
* 12 एफआयआर दाखल
* 7 आस्थापना सील
* 3 वाहने जप्त

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.