'कॉक्रोच जनता पक्षा'चे संस्थापक अभिजित दिपके हे सध्या चर्चेत असून, त्यांनी वकील असीम सरोदे यांना मेसेज करून आपल्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे. या संदर्भात स्वत: सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
दिपके हे परदेशात असून ते ६ जून रोजी दिल्लीत येणार आहेत. अभिजित दिपके यांच्या भूमिकेबाबत माहिती देताना सरोदे म्हणाले, "दिपके यांनी मला मेसेज आणि फोन केला होता. 'मला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण आता देशात क्रांती झाली पाहिजे', अशी त्यांची ठाम भूमिका आहे. मुलांचे दुःख मांडण्यासाठीच 'कॉक्रोच पार्टी' उभी राहिली आहे, अस त्यांनी सांगितले.
असीम सरोदेंचा दिपके यांना सल्ला
दिपके यांच्या देशात परतण्याबाबत सरोदे यांनी त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. "भारतात परत येण्याची सध्याची परिस्थिती काय आहे, याचा दिपके यांनी विचार करावा. सरकार बदल्याच्या भावनेतून वागणार असेल, तर त्यांनी सर्व गोष्टींचे नियोजन करूनच यावे," असे सरोदे यांनी सांगितले. तसेच, "मी त्यांना प्रक्षोभक भाषणे न करता गांधीजींचा मार्ग अवलंबावा, असा सल्ला दिल्याचंही सरोदेंनी स्पष्ट केले.
विमानतळावरच होणार अटक?
दिपके यांच्यावर देशविघातक कृत्य करत असल्याचा 'नॅरेटिव्ह' तयार केलं गेलं आहे. त्यामुळे, ते भारतात आल्यास सरकार त्यांना थेट विमानतळावरूनच अटक करू शकते, असा अंदाज सरोदे यांनी वर्तवला आहे. दिपके यांच्या या मोहिमेला किती पाठिंबा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल असंही सरोदे म्हणाले.दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमाला सोनम वांगचुक, प्रकाश राज हे उपस्थित राहणार असून, दिपके यांनी डॉ. विश्वंभर चौधरी, निखिल वागळे आणि मलाही आमंत्रित केले आहे, असेही सरोदेंनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. सरकारच्या विरोधातील वाढती खदखद आता या माध्यमातून व्यक्त होताना दिसत असल्याचं सरोदे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.