🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आंदोलन उधळण्यासाठी गुंडांचा वापर! अभिजित दीपके यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

आंदोलन उधळण्यासाठी गुंडांचा वापर! अभिजित दीपके यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. गुंड पाठवून हे आंदोलन उधळून लावण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप 'सीजेपी'चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. 
अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून हा आरोप केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचा थेट उल्लेख केलेला नाही. यंत्रणेतील आमच्या सूत्रांनीच यासंदर्भात माहिती दिल्याचा दावा दीपके यांनी केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'जंतर मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या आंदोलनात गुंड पाठवून आम्हाला त्रास द्यायचा आणि आंदोलन उधळून लावायचे, असा कट आखला जात आहे. आम्ही संसदेवर मोर्चा काढणार आहोत, मात्र त्यापूर्वीच आमचे आंदोलन उधळण्यासाठी हे केले जाणार आहे असे आम्हाला समजले आहे.'
वांगचुक यांचे वजन घटले

नीट पेपरफुटीविरोधात आवाज उठवून दीपके यांनी जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील सहभागी झाले असून गेल्या 12 दिवसांपासून ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृतीदेखील खालावत आहे. त्यांचे वजन 7.8 किलोग्रॅमने घटले असून रक्तदाबदेखील कमी झाला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.