🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"'नवे शिक्षणमंत्री हा एक वाईट विनोद!'; भाजपा नेत्याच्या लेकीचा केंद्र सरकारवर तुफानी हल्ला, थेट CJP ला जाहीर पाठिंबा"

"'नवे शिक्षणमंत्री हा एक वाईट विनोद!'; भाजपा नेत्याच्या लेकीचा केंद्र सरकारवर तुफानी हल्ला, थेट CJP ला जाहीर पाठिंबा"


NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात झालेल्या आंदोलनांनंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सुमारे ३६ दिवस चाललेल्या या अभूतपूर्व विद्यार्थी आंदोलनाला मोठा विजय मिळाला असला, तरी आता राजकीय वर्तुळातून आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या घटकांमधूनच सरकारवर टीका होऊ लागली आहे.
उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह हिने ‘जेन-झी’ च्या या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही, तर तिने नव्या शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवर खरमरीत शब्दांत ताशेरेही ओढले आहेत. ‘अल् जझिरा’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत यशस्विनीने आपली भूमिका स्पष्ट केली. “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही काही खूप मोठी ऐतिहासिक क्रांती मानणे ही अत्यंत संकुचित विचारसरणी ठरेल,” असे सांगत तिने प्रधान यांच्या राजीनामा पत्रातील भाषेवरही जोरदार आक्षेप घेतला.

‘पश्चात्ताप नाही, तर स्वतःला शहीद दाखवण्याचा प्रयत्न’

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले होते की, ‘विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये आणि देशविरोधी शक्ती या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नयेत’ म्हणून ते पद सोडत आहेत. यावर भाष्य करताना यशस्विनी म्हणाली, “राजीनाम्याची भाषा पाहता, त्यात कोणतीही दिलगिरी किंवा पश्चात्ताप दिसत नाही. जबाबदारी स्वीकारण्याऐवजी स्वतःला हुतात्मा किंवा शहीद दाखवण्याचाच हा प्रयत्न वाटतो.” 

तसेच, केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांची नवे शिक्षणमंत्री म्हणून केलेली नियुक्ती अत्यंत निराशाजनक असल्याचे तिने म्हटले. “नवीन शिक्षणमंत्र्यांची निवड पाहता, हा एक फार वाईट विनोद वाटतो,” अशा शब्दांत तिने सरकारवर निशाणा साधला.

‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनात सहभाग
NEET पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनात यशस्विनी स्वतः सहभागी झाली होती. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या युवा आणि अराजकीय संघटनेने चालवलेल्या मोहिमेचे तिने भरभरून कौतुक केले.

“अराजकीय असलेल्या सामान्य तरुणांना एकत्र आणण्यात CJP ने उत्तम काम केले. मीम्स, सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. यामुळेच सामान्य नागरिक आणि विद्यार्थी थेट या आंदोलनाशी जोडले गेले.”
‘वडिलांशी राजकीय चर्चा टाळते’

यशस्विनी ही उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदर मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी भाजपची असतानाही केंद्र सरकारविरोधात भूमिका घेण्याबाबत विचारले असता ती म्हणाली, “मी घरात राहत नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून मी एकटीच राहते. मी माझ्या वडिलांशी राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणे पूर्णपणे टाळते. कौटुंबिक राजकारण आणि माझी वैयक्तिक विचारसरणी यांत मी मोठी दरी ठेवली आहे; म्हणूनच कोणत्याही दबावाला बळी न पडता किंवा दुटप्पीपणा न बाळगता मी माझी मते स्पष्टपणे मांडू शकते.”




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.