🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई महापालिकेत तब्बल 61 हजार पगाराची संधी; अंतिम मुदत संपण्यापूर्वी करा अर्ज!

मुंबई महापालिकेत तब्बल 61 हजार पगाराची संधी; अंतिम मुदत संपण्यापूर्वी करा अर्ज!


मुंबई महानगरपालिकेत नोकरी किंवा प्रशासकीय क्षेत्रात कामाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या Gen-Z तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महापालिकेत तब्बल 50 फेलो उमेदवारांची नियुक्ती केली जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 61,500 मानधन मिळणार आहे. 
त्यामुळे सरकारी प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही फेलोशिप महत्त्वाची ठरणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या फेलोशिपच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रशासनामध्ये तरुणांचा सहभाग वाढवणे, त्यांच्या आधुनिक कल्पना आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून महापालिकेच्या कामकाजाला अधिक गतिमान करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
मुंबई महानगरपालिका फेलोशिपसाठी पात्रता काय?

या फेलोशिपसाठी अर्ज करणारा उमेदवार 21 ते 26 वर्षे वयोगटातील पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे बंधनकारक आहे. याशिवाय उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचे चांगले ज्ञान असणे हीदेखील महत्त्वाची अट आहे.

अर्ज कधी आणि कसा करायचा?
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 19 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी 500 शुल्क भरावे लागणार आहे. प्राप्त अर्जांमधून उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर मुलाखतीच्या माध्यमातून अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

दरमहा 61,500 मानधन मिळणार असल्याने मुंबई महापालिका फेलोशिपकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. प्रशासन, सार्वजनिक धोरण आणि शहर विकासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासोबतच आपल्या नव्या कल्पना मांडण्याची संधी या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.