🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणत्या भाज्या खाव्यात?

मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणत्या भाज्या खाव्यात?


साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त माहिती.. 

मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात भाज्यांचा जास्त समावेशकरणे अत्यंत गरजेचे आहे. कारण भाज्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी, तर *फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूरअसतात.

फुलकोबी 

फायबर, जीवनसत्त्वे व खनिजांनी समृद्ध असलेली फुलकोबी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

कोबी 

कमी चरबीयुक्त कोबीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, सोडियम यांसारखी खनिजे व विविध जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

ब्रोकली 

100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये केवळ 2 ग्रॅम साखर असते. भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे असल्यामुळे ब्रोकोली हे मधुमेह रुग्णांसाठी वरदानआहे.

भेंडी 

भेंडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
मधुमेहावर नियंत्रण हवे असेल तर भेंडीचा नियमित आहारात समावेश करा.

काकडी 

100 ग्रॅम काकडीत सुमारे *95 ग्रॅम पाणी* व फक्त *2 ग्रॅम साखर* असते. त्यामुळे काकडी शरीर थंड ठेवते व साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते.

कारले

कारले ही मधुमेहासाठी सर्वोत्तम भाजी मानली जाते. ती नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

दुधी भोपळा

साखरेचे प्रमाण खूप कमी, पचनास हलका आणि साखर नियंत्रणासाठी उपयुक्त.

घोसाळे

कमी कॅलरीज, कमी साखर आणि शरीर थंड ठेवणारी भाजी.

मुळा

मुळा फायबरयुक्त असून रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करतो.

मेथीची भाजी

मेथीमध्ये नैसर्गिक घटक असतात जे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात.

पालक

लोह, फायबर व अँटीऑक्सिडंट्स भरपूर असून साखर वाढवत नाही.

चवळीची भाजी

फायबर जास्त आणि साखर कमी असल्यामुळे शुगर रुग्णांसाठी योग्य.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.