व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित
एकापेक्षा जास्त पासकी : अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही वापरणाऱ्या यूजर्सना आता त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटसाठी एकापेक्षा जास्त पासकी तयार करता येणार आहेत.
पिनऐवजी पासवर्ड: टू- स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये आता 6 अंकी पिनऐवजी अक्षरे, नंबर आणि विशेष चिन्हांचा वापर करून मजबूत पासवर्ड तयार करता येणार आहे.
अनोळखी कॉल्सची माहिती: अँड्रॉईड यूजर्सना अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलचा देश आणि कॉमन व्हॉट्सॲप ग्रुपची माहिती मिळू शकणार आहे.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवापरणाऱ्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित व्हावे यासाठी काही नवीन फीचर्स जारी केले आहेत. कंपनी आता त्यांच्या यूजर्सना साइन-इन आणि अकाऊंट प्रोटेक्शनवर जास्त कंट्रोल ऑफर करणार आहे. या नवीन अपडेटनंतर आता यूजर्स एकापेक्षा जास्त पासकीचा वापर करू शकणार आहेत. यासोबतच टू-स्टेप व्हेरिफिकेशन देखील अधिक मजबूत करण्यात आले आहे. तसेच, अँड्रॉईड यूजर्सना अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत आधीच जास्त माहिती मिळणार आहे. या तिन्ही फीचरबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
एकापेक्षा जास्त पासकी पर्याय
व्हॉट्सॲपने आता पासकी फीचर अधिक चांगले बनवले आहे. पासकी फीचरच्या मदतीने यूजर्स एसएमएस व्हेरिफिकेशन कोड एंटर करण्याऐवजी फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा स्क्रीन लॉकचा वापर करून त्यांच्या अकाऊंटमध्ये पुन्हा लॉगिन करू शकतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, जगभरात एक अब्जहून अधिक लोकांनी त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटसाठी पासकी क्रिएट केली आहे. जर एखादा यूजर अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही डिव्हाईसचा वापर करत असेल तर तो यूजर त्याच्या अकाऊंटसाठी एकापेक्षा जास्त पासकी क्रिएट करू शकतो. पासकी क्रिएट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंटवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर पासकी पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्ही पासकी क्रिएट करू शकता.
पिनऐवजी तयार करू शकता पासवर्ड
व्हॉट्सॲपने त्यांचे टू- स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवले आहे. आतापर्यंत यूजर्सना जास्तीच्या सुरक्षेसाठी 6 डिजीट पिन सेट करण्याचा पर्याय ऑफर केला जात होता. मात्र आता नव्या अपडेटमुळे यामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आता यूजर्स पिनऐवजी पासवर्ड क्रिएट करू शकणार आहेत. यामध्ये अक्षरं, नंबर आणि विशेष कॅरेक्टर्सचा देखील समाविष्ट केले जाऊ शकतात. मोठा आणि जास्त कॉम्प्लेक्स पासवर्ड असल्यामुळे दुसरा व्यक्ती हा पासवर्ड अगदी सहज ओळखू शकणार नाहीत.
अनोळखी कॉल्सची माहिती मिळणार
व्हॉट्सॲप आता अँड्रॉईड यूजर्सना अनोळखी कॉल्सची माहिती देणार आहे. जर यूजरला अशा एखाद्या नंबरवरून कॉल येत आहे, जो त्याच्या संपर्क यादीत समाविष्ट नाही, तर अशावेळी व्हॉट्सॲप यूजरला संबंधित कॉलबाबत जास्तीची माहिती दाखवली जाणार आहे. यामध्ये समजू शकते की, कॉल करणारी व्यक्ती दुसऱ्या देशाची आहे की नाही आणि हा व्यक्ती यूजरसोबत कोणत्या ग्रुपमध्ये जोडला आहे की नाही. यामुळे यूजर अंदाज लावू शकतात की ही व्यक्ती कोण असू शकते आणि ठरवू शकतात की कॉल रिसिव्ह करायचा आहे की नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.