🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज हरपला: बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास घस्ते यांचे वृद्धापकाळाने निधन

आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज हरपला: बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास घस्ते यांचे वृद्धापकाळाने निधन


आष्टा :-फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीचा निष्ठावंत प्रसारक आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व, बहुजन समाज पार्टीचे (बसपा) माजी जिल्हाध्यक्ष विश्वास गुंडा घस्ते (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते ज्येष्ठ पत्रकार अजित घस्ते यांचे वडील होत.

​विश्वास घस्ते यांनी आपल्या हयातीत आंबेडकरी चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. 'दैनिक सम्राट' वृत्तपत्र सुरू झाल्यापासून ते आजअखेर त्याचे नियमित वाचक होते. आष्टा शहर आणि परिसरात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे साहित्य आणि वृत्तपत्रे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
​आपल्या कार्यकाळात त्यांनी बसपाच्या माध्यमातून बहुजन समाजातील अनेक मूलभूत प्रश्न धडाडीने मार्गी लावले. सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्यात ते नेहमी अग्रभागी असत. संपूर्ण सांगली जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रात एक अभ्यासू, आक्रमक आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. त्यांच्या अचानक जाण्याने आंबेडकरी आणि बहुजन चळवळीत कधीही भरून न 
निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

​त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले असून, रक्षा विसर्जन कार्यक्रम गुरुवार, दि. २७ रोजी आष्टा येथे होणार आहे, अशी माहिती घस्ते परिवाराकडून देण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.