🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयुष्य संपवण्यापूर्वी अभिनेत्याचा धक्कादायक निर्णय; २० कोटींची संपत्ती मोलकरणीच्या नावे, भिंतीवर सोडली अंतिम नोट!

आयुष्य संपवण्यापूर्वी अभिनेत्याचा धक्कादायक निर्णय; २० कोटींची संपत्ती मोलकरणीच्या नावे, भिंतीवर सोडली अंतिम नोट!


फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातही अशा काही घटना घडतात. ज्या फिल्मी कथेपेक्षा कमी नसतात. तेलगू फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा एका अभिनेत्याबाबत अशीच थक्क करणारी कथा समोर आली आहे.

सुमारे 11 वर्षांपूर्वी, या क्षेत्रातील एका अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याच्या एका अंतिम इच्छेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले; असे म्हटले जाते की, मृत्यूपूर्वी त्याने एक मेसेज लिहून ठेवला होता, ज्यामध्ये त्याने आपली संपूर्ण मालमत्ता अशा व्यक्तीच्या नावे करण्याची इच्छा व्यक्त केली होती, जिचा कोणीही विचार केला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्याने भिंतीवर काळ्या मार्करने एक चिठ्ठी लिहिली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपली मालमत्ता कुटुंबाच्या नावे करण्याऐवजी त्याने ती आपल्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या नावे केली. आपल्या त्या अखेरच्या चिठ्ठीत त्याने लिहिले होते, "हे संपत्ती तिला द्या; तिला त्रास देऊ नका."

त्या संध्याकाळी त्यांची मुलगी नीरजा त्यांना भेटायला गेली होती

अभिनेते रंगनाथ यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 19 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी हैदराबादमधील त्यांच्या घरी त्यांनी आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या संध्याकाळी त्यांची मुलगी नीरजा त्यांना भेटायला गेली होती. तिने भरपूरवेळा दरवाजा ठोठावला, परंतु त्यांनी दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी तो दरवाजा तोडला आणि त्यांना आत जाऊन पाहिले.

त्यांनी एका मित्राला आपला शेवटचा मेसेज पाठवला होता


त्या काळातील वृत्तांवरून असे समजते की, रंगनाथ हे दीर्घकाळापासून डिप्रेशन आणि एकाकीपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनानंतर काही कटू वास्तव समोर आले; नंतर एका मुलाखतीत त्यांच्या मुलीने सांगितले की, त्यांनी यापूर्वी अनेकदा आत्महत्येचे विचार केले होते आणि त्यासाठी समुपदेशनही घेतले होते. रंगनाथ यांनी दुपारी 3.30 वाजता त्यांचे मित्र बी. देवदास यांना शेवटचा मेसेज पाठवला होता. या एसएमएसद्वारे त्यांनी 'गुडबाय' म्हटले होते.
त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील चक्क भिंतीवर लिहून ठेवला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरी काम करणाऱ्या मीनाक्षी त्या दिवशी त्यांच्यासाठी जेवण बनवायला आल्या होत्या. आपले काम आटोपून निघून गेल्या होत्या. त्यावेळी मात्र, त्यांच्या आयुष्यात इतका मोठा कलाटणी देणारा क्षण येणार आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती; रंगनाथन यांनी आपली संपूर्ण मालमत्ता त्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता, हे त्यांना माहीत नव्हते. रंगनाथन यांना हा निर्णय अंतिम ठेवायचा होता, म्हणूनच त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील चक्क भिंतीवर लिहून ठेवला होता.

रंगनाथन यांची एकूण संपत्ती सुमारे 10 ते 20 कोटी रुपये


मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मालमत्तेबाबतच्या या निर्णयामागील नेमके कारण कधीही अधिकृतपणे स्पष्ट झाले नाही. अहवालांनुसार, रंगनाथन यांची एकूण संपत्ती 10 ते 20 कोटी रुपयांच्या दरम्यान होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.