🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पणचा दणका! बातमीचा धडाकेबाज प्रभाव: बँक व्यवस्थापकाच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या अंकलीच्या सरपंचाचा बुरखा टंगला; दडपापडपीचा 'वडापाव' मध्यस्थीचा खेळ उघडकीस!​

सांगली दर्पणचा दणका! बातमीचा धडाकेबाज प्रभाव: बँक व्यवस्थापकाच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या अंकलीच्या सरपंचाचा बुरखा टंगला; दडपापडपीचा 'वडापाव' मध्यस्थीचा खेळ उघडकीस!


सांगली :-​ स्थानिक जनतेने ज्याच्यावर विश्वासाने गावची धुरा सोपवली, त्याच अंकली गावच्या सरपंचाने चक्क एका बँक व्यवस्थापकाच्या बंद घरात दरोडा टाकून ६ लाखांचा ऐवज लांबवल्याचा घृणास्पद प्रकार 'सांगली दर्पण'ने समोर आणताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे!
​'सांगली दर्पण'च्या त्या दणकेबाज बातमीचा थेट इम्पॅक्ट झाला असून, पोलिसांनी घाईघाईने कारवाई करत सरपंच राहुल अनिल पाटील (वय ३६) याच्या मुसक्या आवळल्या आणि चोरीचे दागिनेही जप्त केले.

​काय आहे 'वडापाव' मध्यस्थीचे गूढ?
एरवी दुचाकी चोर पकडला तरी स्वतःचे फोटो छापून प्रसारमाध्यमांना भलेमोठे कागद वाटणारे पोलीस या व्हीआयपी चोराच्या बाबतीत मात्र अचानक 'मौनव्रत' धारण करून बसले होते. 'सांगली दर्पण'ने जेव्हा या दडपापडपीवर प्रश्न उपस्थित केले, तेव्हा पोलिसांचे धाबे दणाणले.

​सूत्रानुसार, हा संपूर्ण गुन्हा दाबण्यासाठी आणि पोलिसांचा तपास 'थंड' करण्यासाठी काही मध्यस्थांनी खाजगी भेटीगाठी घेऊन 'वडापाव' मध्यस्थी (आर्थिक देवाणघेवाण आणि प्रकरण मिटवण्याची घाई) घडवून आणल्याची खमंग चर्चा आता रंगली आहे. याच 'वडापाव मध्यस्थी'च्या जोरावर दागिने जप्त होताच वैद्यकीय कारणाचे कागदी घोडे नाचवून सरपंचाची तात्काळ जामिनावर सुटका करण्यात आली!
​'सांगली दर्पण'चा सवाल: हा न्याय की संशयित तडजोड?
​गोपनीयता कोणासाठी? सर्वसामान्यांवर लगेच गुन्हे दाखल करून कोठडी ठोकणारे पोलीस, लोकप्रतिनिधी असलेल्या चोराला गुप्तपणे अटक आणि सुटका कशासाठी देतात?

​वैद्यकीय कारण की मॅनेजमेंट? गुन्हा केला तेव्हा सरपंच ठणठणीत होता, मग पोलीस कोठडी टाळण्यासाठी अचानक वैद्यकीय कारण कुठे निघून आले? 
​इतर गुन्ह्यांचे काय? 

या सरपंचाने आणखी किती ठिकाणी डल्ला मारला आहे? 'वडापाव मध्यस्थी'मुळे इतर चोऱ्यांचा  तपासही गुंडाळला जाणार का? ​ज्या सरपंचाने गावची सुरक्षा करायची, तोच भामटा निघाल्याने अंकली गावाची मान खाली गेली आहे. 'सांगली दर्पण'च्या या बातमीच्या इम्पॅक्टमुळे सध्या पोलीस प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, जनतेतून आता या 'मध्यस्थी' करणाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.