'भारतातील युवकांना कुणीही रोखू शकत नाही', एनडीएच्या मंत्र्याचा भाजपाला घरचा आहेर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज (१० ऑक्टोबर) आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
मागच्या अनुभवानंतर केंद्र सरकारने हे आंदोलन वेळीच रोखण्यासाठी जय्यत तयारी केली असून आंदोलकांना जंतर-मंतरवर पोहोचण्यापासून ऐनकेन प्रकारे रोखले जात आहे. शुक्रवारी दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमधून सीजेपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. तसेच रात्री ९ पासून दिल्लीतील ५० हून अधिक मेट्रो स्थानकावरची सेवा खंडीत करण्यात आली. तसेच रात्री १० वाजल्यापासून मध्य दिल्लीतील मोबाइल इंटरनेट ब्लॉक करण्यात आले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तीन दिवस आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी जंतर-मंतर, आकाशवाणी भवन आणि निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत आंदोलन केले होते. त्याआधी विद्यार्थी संघटनेच्या नेत्या नेहा बोरा, योगेंद्र यादव यांनीही जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.
आता सीजेपी आणि विरोधी पक्षाच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारने दिल्लीमध्ये बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ही ३७ कलमी सुरक्षा व्यवस्था आहे, अशी माहिती सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली. यासाठी निमलष्करी दलाची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र दलाचे सुमारे २३ हजार जवान आणि दिल्ली पोलिसांचे ५,००० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.