"का घेतलीस अशी अचानक एक्झिट, नाना?"... पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची ह्रदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल.
नागपूर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलेली भावनिक प्रतिक्रिया मनाला चटका लावणारी आहे.प्रदीर्घ काळ मुंबईत सेवा दिलेले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील देखील त्यांच्या अशा अचानक जाण्याने भावूक झाले आहेत.नाना यांच्याशी कौटुंबिक आणि ऋणानुबंधांचे नाते असल्याने पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून नानांविषयी असलेल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त नांगरे पाटील …
"नाना, तुला मी आवडत होतो ना! तू पोलिसांसाठी पोलादासारखा उभा राहायचास. परवाच आपण बोललो होतो. नागपूर पोलिसांसाठी उद्या मुंबईला येऊन रेकॉर्डिंग करून देणार होतास. आता कोणाचा मानसिक आधार घेणार?" अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.नाना पाटेकर हे केवळ पडद्यावरील अभिनेते नव्हते, तर समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व होते, अशा भावना त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाल्या.
तू शेतकऱ्यांचा वाली होतास रे!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत नाना पाटेकर यांची असलेली तळमळ, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची वृत्ती आणि निर्भीड स्वभाव पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जवळून अनुभवला आहे. त्यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख आपल्या पोस्ट मधून केला आहे. यात पोलीस आयुक्त म्हणाले
" नाना तू शेतकऱ्यांचा वाली होतास रे! तू निर्भय होतास, बेधडक होतास, अस्सल मर्द होतास. तुला काहीच कसं वाटलं नाही, असं अचानक एक्झिट घेऊन गेलास?" या शब्दांत नांगरे पाटील यांनी नाना पाटेकर यांच्या जाण्याने झालेल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे.
नाना पाटेकर आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यातील संवादातून निर्माण झालेला जिव्हाळा या प्रतिक्रियेतून अधोरेखित होतो. नुकत्याच झालेल्या संवादानंतर दुसऱ्याच क्षणी व्यक्ती कायमची दूर गेल्याची भावना किती वेदनादायी असते, याची प्रचिती त्यांच्या शब्दांतून येते.
पोलीस आयुक्तांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग ….
तरुणांमध्ये प्रचंड फॅन फाॅलोविंग असलेले पोलीस आयुक्त सतत समाज माध्यमांवर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यात नाना गेल्यानंतर त्यांनी आपल्या समाज माध्यमांवरील भिंतींवर एक भावनिक पोस्ट केली आहे. ती सध्या व्हायरल होत आहे. नाना पाटेकर यांच्याशी नुकतेच बोलणे झाले होते. नागपूर पोलिसांसाठी रेकॉर्डिंग करण्याच्या कामानिमित्त ते उद्या मुंबईला येणार होते. मात्र, अचानक एक्झिट घेतल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देताना नांगरे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.