गेल्या काही वर्षांमध्ये रोबो अर्थात यंत्रमानवाचा वापर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक जोखमीची कामं हे रोबो सहज करत असल्याने बऱ्याच ठिकाणी रोबो सर्रास वापरले जातात. मात्र या रोबोंचा वापर काही गैरकृत्ये करण्यासाठीही करून घेतला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जर्मनीमध्ये अशीच एक घटना घडली असून, त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणे भाग पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १२० सेंटीमीटर उंचा आणि लाल व सोनेरी रंग असलेला एक रोबो एका तरुणीजवळ पोहोचला. तसेच तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करू लागला. ही घटना समोर येताच पोलिसांनी हा रोबो जब्त केला असून, या प्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री जर्मनीतील कोलोनमधील एखा फास्ट फूड रेस्टॉरंटच्या बाहेर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर तरुणी तिच्या १७ आणि १८ वर्षांच्या दोन मैत्रिणींसह तिथे उभी होती. तेवढ्यात रात्री ११.४५ च्या सुमारास एक रोबो मागून त्या तरुणीजवळ पोहोचला. तसेच तिला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करून अश्लील चाळे करू लागला.
हा प्रकार घडत असताना हा रोबो काम कसं करत होता, असा प्रश्न आता या प्रकरणात उपस्थित होत आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात या रोबोचा १६ वर्षीय मालक आणि त्याच्या १९ वर्षांच्या सहकाऱ्याचा हा असल्याचा संशय आहे. तसेच या दोघांपैकी कुणीतरी रोबोच्या हालचाली रिमोटद्वारे जाणीवपूर्वक नियंत्रित केल्या होत्या का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. एवढंच नाही तर या रोबोचा मालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या घटनेचं चित्रिकरण केलं तसेच ते सोशल मीडियावर थेट प्रसारित केलं, अशी माहितीही समोर आली आहे. या दोघांपैकी एकाने या घटनेचं समालोचनही केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दोघांचेही फोन जप्त केले आहेत.दरम्यान, सदर तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच तिथे आरोपी तरुण आढळून आले. आरोपी तरुणांनी हा रोबो एका वॅक्सवॅगन कारच्या डिकीत लपवला होता. आता अधिकाऱ्यांनी हा रोबो आपल्या ताब्यात घेतला आहे. तसेच रोबोसोबत दोन फोनही जप्त केले आहेत. आता ही घटना घडली तेव्हा हा रोबो कशा प्रकारे चालवला जात होता, तसेच ही घटना घडली तेव्हा हा रोबो कशा प्रकारे ऑपरेट होत होता, त्याच्या हालचाली कशा प्रकारे नियंत्रित केल्या जात होत्या, याचा शोघ घेतला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.