🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"डोक्यात मंगळसूत्र अन् पायात खडतर वाट! लग्नानंतर १८ किमी चालत सासरी गेलेली नवरी ठरली प्रशासनाच्या अपयशाची जिवंत पावती"

​"डोक्यात मंगळसूत्र अन् पायात खडतर वाट! लग्नानंतर १८ किमी चालत सासरी गेलेली नवरी ठरली प्रशासनाच्या अपयशाची जिवंत पावती"


गृह प्रवेशाचा शुभमुहूर्त चुकू नये म्हणून एका नववधूला लग्नानंतर लेहेंग्यात धावपळ करावी लागली. उत्तराखंडमधील चकराता ब्लॉकमध्ये ही घटना घडली. स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही उदावा गावापर्यंत रस्ता पोहोचू शकलेला नाही. 



बुल्हाड गावातून पाठवणी झाल्यानंतर शर्मिला नावाच्या नववधूला सासरच्या घरापर्यंत तब्बल १८ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. हे करताना नवरी चक्क दमताना दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नववधूने थेट मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे गावात रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे.


लग्नानंतर १८ किमीची पायपीट

शर्मिलाचं उदावा गावातील अनिल चौहानशी लग्न झालं. लग्नानंतर जेव्हा पाठवणीची वेळ आली तेव्हा नववधू बुल्हाड गावातून गाड्यांच्या ताफ्यासह लोखंडीपर्यंत तर आरामात आली, मात्र खरी परीक्षा यापुढची होती. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटूनही उदावा गावापर्यंत पक्का रस्ता पोहोचलेला नाही. याचा परिणाम असा झाला की, शर्मिलाला लग्नानंतर चार तास पायी चालत १८ किलोमीटरचा खडतर आणि दुर्गम डोंगराळ रस्ता पार करावा लागला.

जौनसार-बावर की अनूठी परंपरा, लेकिन सड़क के इंतजार में एक गांव!

उत्तराखंड के देहरादून जिले के चकराता क्षेत्र के उदावा गांव की एक शादी का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। यह वीडियो लोगों का ध्यान दो वजहों से खींच रहा है- एक तरफ जौनसार-बावर की अनूठी परंपरा, तो दूसरी तरफ गांव तक सड़क न पहुंचने की परेशानी.

जौनसार-बावर में ‘जोजोड़’ नाम की एक खास परंपरा है। इसमें दुल्हन अपने घर से दूल्हे के घर तक बारात का नेतृत्व करती है. मंगलवार को बुल्हाड़ गांव की शर्मिला भी इसी परंपरा के तहत उदावा गांव के अनिल से शादी करने के लिए निकलीं.

लेकिन उदावा गांव तक मोटर मार्ग नहीं होने के कारण शर्मिला और बारात को करीब 8 किलोमीटर का रास्ता पैदल तय करना पड़ा. इस सफर में उन्हें लगभग ढाई घंटे लग गए। शादी के दिन जहां परिवार और रिश्तेदार खुशियों में शामिल थे, वहीं इस लंबी पैदल यात्रा ने गांव की एक बड़ी समस्या को भी उजागर कर दिया.

यह वीडियो एक ओर जौनसार-बावर की सदियों पुरानी और समृद्ध संस्कृति की खूबसूरत झलक दिखाता है, तो दूसरी ओर उन गांवों की मुश्किलें भी सामने लाता है, जो आज भी बुनियादी सुविधाओं का इंतजार कर रहे हैं। जिस रास्ते से शर्मिला अपनी शादी के दिन गुजरीं, उसी रास्ते का इस्तेमाल ग्रामीण बीमार पड़ने पर अस्पताल पहुंचने और बाजार से जरूरी सामान लाने के लिए करते हैं.

शर्मिला ने मुख्यमंत्री @pushkardhami से उदावा गांव तक सड़क बनाने की मांग की है. उन्होंने कहा कि सड़क बनने से ग्रामीणों की रोजमर्रा की परेशानियां कम होंगी और आने वाली पीढ़ियों को ऐसी मुश्किलों का सामना नहीं करना पड़ेगा. https://t.co/7H09LfXSJH — Kishor Joshi (@KishorJoshi02) October 22, 2026




गृहप्रवेशाचा शुभमुहूर्त साधण्याचं आव्हान

चार तासांच्या या थकवणाऱ्या प्रवासात गृहप्रवेशाचा शुभमुहूर्त साधणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. पायपीट करताना वेळ निघून जाऊन शुभमुहूर्त टळेल की काय, अशी भीती शर्मिलाला वाटत होती. मग काय, नववधूने कोणताही विचार न करता अंगावरील जड आणि भरजरी लग्नाच्या लेहेंग्यात धावण्यास सुरुवात केली. लेहेंग्यात नवरीला अशा प्रकारे धावताना ज्याने ज्याने पाहिले, तो प्रत्येक जण अवाक झाला.




मुख्यमंत्री धामी यांच्याकडे रस्त्याची मागणी

थकलेल्या शर्मिलाचा गावकऱ्यांनी एक व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शर्मिला थेट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे विनवणी करताना दिसत आहे. ती म्हणते की, आजतर ती या खडकाळ आणि कच्च्या रस्त्यावरून धावत सासरच्या घरी पोहोचत आहे, परंतु सरकारने लवकरात लवकर या गावाला पक्क्या रस्ता करून जोडावं, जेणेकरून भविष्यात इतर कोणत्याही नववधूला तिच्या लग्नाच्या दिवशी अशा प्रकारे धावावं लागणार नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.