🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिवाळी सफाईचा ताण संपला! २ मिनिटांत पंखा लखलखण्याची सोपी ट्रिक व्हायरल

दिवाळी सफाईचा ताण संपला! २ मिनिटांत पंखा लखलखण्याची सोपी ट्रिक व्हायरल


अनेकांच्या घरात आता दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. घरातील पोटमाळ्यापासून, खिडक्या, पडदे आणि फर्निचर सर्व वेळ मिळेल तसं स्वच्छ केलं जात आहे, पण साफसफाईच्या नादात छतावरील पंख्यांकडे मात्र दुर्लक्ष होते.

वरती असल्यामुळे पंख्यांवर साचलेली धूळ सहजपणे डोळ्यांना दिसत नाही. पण खूप दिवसांनी पंख्यावरील धूळ खाली पडू लागते तेव्हा तो साफ करण्याची वेळ आली हे समजते. अशा वेळी दिवाळीपूर्वी पंखा काही मिनिटांत चकाचक करण्यासाठी सोप्या ट्रिक जाणून घेऊ..


पंखा न उतरवता धूळ न सांडता सफाई करण्याची एक सोपी ट्रिक आहे. यासाठी घरात असलेले जुने उशीचे कव्हर (पिलोकेस) खूप उपयोगी पडू शकते. पंख्याची प्रत्येक पात त्या कव्हरमध्ये अलगद घालून कव्हर थोडे ओढल्यास पंख्यावरची सर्व धूळ थेट त्या कव्हरमध्ये जमा होते आणि खाली पडत नाही. सर्व पात्यांची स्वच्छता झाल्यानंतर कव्हर बाहेर नेऊन उलटे करा आणि त्यातील धूळ कचराकुंडीत टाका. या पद्धतीमुळे फर्निचर आणि जमिनीवर धूळ पसरण्याची चिंता बरीच कमी होते.

चिकट आणि हट्टी मळ काढण्यासाठी काय करावे?

अनेकदा पंख्याच्या पात्यांवर केवळ धूळच नसते, तर विशेषतः स्वयंपाकघराजवळ असलेल्या पंख्यांवर धुळीसह तेलाचा किंवा चिकटपणाचा एक थर जमा होतो. अशा वेळी फक्त कोरड्या कपड्याने किंवा कव्हरने साफ केल्याने पूर्ण घाण निघत नाही. यासाठी आधी पात्यांवरची कोरडी धूळ काढून घ्या. त्यानंतर एका हलक्या ओल्या कपड्यावर साधा क्लिनर (डिटर्जंट) घेऊन पात स्वच्छ करू शकता. लक्षात ठेवा, क्लिनर थेट पंख्यावर मारू नका (स्प्रे करू नका). कारण कोणताही लिक्विड पदार्थ पंख्याच्या इलेक्ट्रिक भागापर्यंत पोहोचू शकतो. 

सफाई केल्यानंतर पंख्याची पाती पूर्णपणे सुकू द्या. ओल्या पृष्ठभागावर धूळ लवकर चिकटू शकते, त्यामुळे सफाई केल्यानंतर लगेच पंखा सुरू करणे टाळा. जर पात्यांवर जास्त चिकटपणा जमा झाला असेल तर कव्हरचा आतील भाग हलका ओला करूनही सफाई केली जाऊ शकते.




सफाई करताना ‘या’ चुका टाळा:

पंख्याची साफसफाई सोपी आहे, परंतु घाईघाईत केलेल्या काही चुकांमुळे पंख्याचे नुकसान होऊ शकते.

सगळ्यात आधी पंखा बंद करा आणि त्याची पाती पूर्णपणे थांबेपर्यंत थांबा.

साफसफाई करताना पाण्याचा अतिवापर अजिबात करू नका.

पात्यांना साफ करताना खूप जास्त जोर किंवा दाब देऊ नका. जास्त जोर लावल्याने पात्यांचा आकार वाकडा होऊ शकतो आणि त्यांचा समतोल बिघडू शकतो, म्हणूनच स्वच्छता नेहमी हलक्या हाताने करावी.

दिवाळीपूर्वी पंखा किती वेळा साफ करावा?

पंखा किती वेळा स्वच्छ करावा याचा कोणताही निश्चित नियम नाही. पात्यांवर धूळ दिसू लागल्यास साफ करून घ्यावा. साधारणपणे महिन्यातून एकदा पंख्याची सफाई केल्यास जास्त धूळ साचत नाही आणि नंतर सफाई करणेही सोपे जाते. ज्या घरात पाळीव प्राणी आहेत, खिडक्या जास्त वेळ उघड्या असतात किंवा आजूबाजूला बांधकाम सुरू आहे, तिथे पंख्यावर धूळ लवकर जमा होते. अशा घरांमध्ये गरजेनुसार पंखे वारंवार साफ करावे लागतील.




सफाई केल्यानंतरही पंखा हलत असेल तर काय करावे?

सफाई केल्यानंतरही जर पंखा हलत असेल, विचित्र आवाज येत असेल किंवा आधीच्या तुलनेत हवा कमी देत असेल तर त्याचे कारण केवळ धूळ असू शकत नाही. सैल झालेली पाती, खराब झालेली बेअरिंग किंवा मोटरशी संबंधित समस्या याचे कारण असू शकते. अशा परिस्थितीत पंख्याची फिटिंग आणि इतर भागांची तपासणी करून घ्या आणि तांत्रिक बिघाड असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.