सिंधुदुर्ग: नवनाथ बन यांनी नको ते आरोप शिवसेनेवर करू नयेत. एकनाथ शिंदे यांचं नाव घेण्यासाठी तुला कुणी संमती दिली होती का? ज्याने दिली असेल त्यांचे नाव सांग.
तुझं करिअर आताच सुरू झालंय, नको त्या वाट्याला जावू नको. अंगाशी आलं तर रडायला पण वेळ मिळणार नाही असं सांगत निलेश राणे यांनी भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, नवनाथ बन हा माझा मित्र नाही. तो मला ज्युनिअर आहे. मी २००९ साली खासदार झालो तेव्हा तो चड्डीत होता. शाळेत असेल. मी ऐऱ्यागैऱ्याला मित्र बनवत नसतो.
पदवीधरला सहकार्य केले नाही असा आरोप बन करतो. माझ्याकडे वाई, फलटणची जबाबदारी होती. भाजपाचा कोण माणूसच आमच्या जिल्हाप्रमुखाकडे आला नव्हता. पदवीधर लढत होता, मग एकदाही कुणी भेटायला आलं नव्हते असा आरोप त्यांनी केला.
तसेच आम्ही आमचे कर्तव्य केले. बन याने आम्हाला शिकवू नये. कुणाला उत्तर द्यायचे हे आम्ही पाहू. तू कोण आहेस? आता कुठेतरी तुझे करिअर सुरुवात झालंय, स्वत:हून कशाला संपवतोय? असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, माझ्या मालवण निवडणुकीवेळी काय काय झाले हे सांगितले तर अनेक प्रकरणे उघडतील. आम्ही युतीत आहोत.
एकमेकांचे सहकार्य करत आहोत. पूर्णेकर कुटुंबाच्या प्रकरणात एकदाही भाजपाने बाजू घेतली का? एकनाथ शिंदेंवर आरोप झाले कुणी उत्तर दिले का? आमच्याकडेही बोलायला खूप आहे. भाजपा आमचा पक्ष आहे, त्यासाठी आम्हीही मेहनत घेतोय. कोणतरी आम्हाला प्रश्न विचारतोय त्यावर मी का उत्तर देऊ? विरोधकांना फायदा होईल एवढी अक्कल बन याला असायला हवी होती. पत्रकारिता सोडून आत्ताच नगरसेवक बनलाय. कसा जिंकला हे माहिती आहे. आम्हाला युती हवी. आम्ही सगळ्यांना मानतो. पण उगाच शिंदेंवर आरोप केलेत तर आम्ही शब्द जपून वापरणार नाही असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.