🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"घरात अर्थमंत्री, रस्त्यावर पती! निर्मला सीतारामण यांच्याविरोधात पारकल प्रभाकर उतरले मैदानात; खळबळजनक आंदोलनात साथ कोणाची?"

"घरात अर्थमंत्री, रस्त्यावर पती! निर्मला सीतारामण यांच्याविरोधात पारकल प्रभाकर उतरले मैदानात; खळबळजनक आंदोलनात साथ कोणाची?"


केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि ख्यातनाम राजकीय अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर येत्या २३ ऑक्टोबरला 'एसआयआर' (SIR) विरोधात आयोजित करण्यात येणाऱ्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहेत.

'पीपल अगेंस्ट एसआयआर' (PAS) या आघाडीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मंचावर त्यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे देखील असणार आहेत. त्याशिवाय, 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके हेदेखील असण्याची चर्चा आहे. २३ ऑक्टोबरला होणाऱ्या या देशव्यापी जनआंदोलनाचा उद्देश लोकशाहीची पुनर्रचना आणि संरक्षणासाठी आवाज उठवणे हा आहे. या आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार असून, एसआयआर प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवण्यात येणार आहे. 




SIR प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पात्र मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप या आघाडीकडून करण्यात आला आहे. एनडीए सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका करणारे परकला प्रभाकर यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक गल्लीत जंतरमंतर! शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जनमोर्चा काढला जाईल. चला, या आव्हानाला सामोरे जाऊया.

या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, निर्मला सीतारमण या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि देशाच्या वित्तमंत्री असताना त्यांचे पती पराकला प्रभाकर यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या काही धोरणांवर आणि भूमिकेवर उघडपणे टीका केली आहे. याआधी त्यांनी 'द क्रुक्ड टिम्बर ऑफ न्यू इंडिया' या पुस्तकातून नोटबंदी आणि वाढत्या बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवरून रोखठोक मते मांडली आहेत. आता या नवीन देशव्यापी आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.