🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शहीद अशोक कागटे क्रीडा नगरीत पोलीस क्रीडा स्पर्धेचा रणसंग्राम; पहिल्याच दिवशी सांगली, साताऱ्याचा धडाका!

शहीद अशोक कागटे क्रीडा नगरीत पोलीस क्रीडा स्पर्धेचा रणसंग्राम; पहिल्याच दिवशी सांगली, साताऱ्याचा धडाका!


सांगली :- येथील विश्रामबाग पोलीस मुख्यालय मैदानातील ‘शहीद अशोक कागटे क्रीडा नगरीत’ ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. या पाचदिवसीय क्रीडा महाकुंभात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण अशा ६ जिल्ह्यांतील एकूण ६६४ पुरुष आणि २३६ महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला आहे.

​वैयक्तिक ॲथलेटिक्स प्रकारातील विजेते:

पहिल्या दिवशी पार पडलेल्या मैदानी स्पर्धांमध्ये खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली:

​उंची उडी: महिला गटात साताराच्या हर्षदा गडदे यांनी तर पुरुष गटात कोल्हापूरच्या प्रसाद पेडणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

​४०० मीटर अडथळा शर्यत: पुरुष गटात साताऱ्याचे महादेव बांगर आणि महिला गटात पुणे ग्रामीणच्या पायल संपुढे यांनी अव्वल स्थान मिळवले.

​हातोडा फेकी (हॅमर थ्रो): कोल्हापूरच्या विनायक कांबळे यांनी बाजी मारली.

​१० किलोमीटर धावणे: पुणे ग्रामीणच्या सुजित तिकोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

सांघिक खेळांमधील रंगत:

लीग पद्धतीने खेळवल्या जात असलेल्या सांघिक सामन्यांमध्येही जोरदार चुरस पाहायला मिळाली:
​व्हॉलीबॉल: पुरुष गटात सांगलीने तर महिला गटात कोल्हापूर आणि सातारा संघाने आपापले सामने जिंकून आघाडी मिळवली.

​हॅण्डबॉल: पुरुष गटात सांगली व कोल्हापूर संघाने विजय नोंदवला.




​खो-खो: पुरुष गटात सोलापूर ग्रामीण तर महिला गटात सोलापूर शहर आणि पुणे ग्रामीण संघाने बाजी मारली.

​कबड्डी: महिला गटात कोल्हापूर संघाने दणदणीत विजय मिळवला.

​​नागरिकांना थेट सामने पाहण्याची संधी:

ही स्पर्धा २५ ऑक्टोबर २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६:३० ते रात्री १०:०० या वेळेत पार पडणार आहे. सांगलीतील क्रीडाप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.