🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत संतापजनक प्रकार! जुन्या गांधीनगरात मतिमंद मुलीवर नराधम बाप-लेकाचा अत्याचार; दोघेही बेड्यांत

मिरजेत संतापजनक प्रकार! जुन्या गांधीनगरात मतिमंद मुलीवर नराधम बाप-लेकाचा अत्याचार; दोघेही बेड्यांत


मिरज :- संस्कृती आणि परंपरेचा वारसा सांगणाऱ्या सांगली-मिरज नगरीत एक अत्यंत संतापजनक आणि मान खाली घालायला लावणारी घटना उघडकीस आली आहे. मिरजेतील जुना गांधीनगर परिसरात एका असहाय्य आणि मतिमंद मुलीवर तिच्याच नातेवाईक असणाऱ्या नराधम बाप-लेकाने अत्याचार केल्याची शीरशिरी आणणारी घटना घडली आहे. 


याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी तत्परता दाखवत अमोल चाँद पटेल आणि चाँद मीरासाब पटेल या बाप-लेकाला बेड्या ठोकल्या आहेत.

​नेमकी घटना काय?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील पोट भरण्यासाठी दिवसभर मजुरीची कष्टाची कामे करतात. आई-वडील घराबाहेर असल्यामुळे ती मतिमंद मुलगी घरी एकटीच असते. संशयित आरोपी हे नात्याने पीडितेचे नातेवाईक असून ते तिच्या घराशेजारीच राहतात. 


या जवळकीचा आणि पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत, २९ तारखेला नराधम अमोल पटेल याने पीडितेच्या घरात बळच प्रवेश केला आणि तिच्यावर अत्यंत अमानुषपणे अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, त्याचे वडील चाँद मीरासाब पटेल यानेही या मुलीसोबत गैरकृत्य केले.
​धमकीमुळे पीडितेच्या कुटूंबावर भीतीचे सावट 

या नराधमांनी केलेल्या या कृत्यानंतर, अमोल पटेल याने पीडितेस हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकेल, अशी भयानक धमकी दिली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी हिंमत दाखवत अखेर मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत दोन्ही नराधम बाप-लेकाला अटक केली आहे.




​समाजातून तीव्र संताप

दिवसेंदिवस ढासळत्या नैतिकतेचे आणि विकृत मानसिकतेचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेमुळे मिरज शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मतिमंद आणि असुरक्षित मुलींना लक्ष्य करणाऱ्या अशा प्रवृत्तींच्या नराधमांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.