मनोज जरांगे पाटील हे सुपारीबाज आहेत. पहिले त्यांनी बारामतीची सुपारी घेतली होती. राजेश टोपे आणि पवार साहेबांनी काय दिलं? असा सवाल करत अजय बारस्कर यांनी जरांगेवर टीका केली. नंतर दुसऱ्याची नंतर तिसऱ्याची सुपारी असं सुरु आहे. मराठा समाज 100 टक्के आरक्षणात गेलाय असं जरांगे बोलले, उपोषण बंद, मोर्चे बंद केली. मराठा समाजाने आत्महत्या केल्या जरांगेमुळं, आरक्षण नाही असा फेक नॅरेटिव्ह जरांगेने केल्याचे बारस्कर म्हणाले. एसईबीसीच्या 10 टक्केचं काय करायचे ओबीसीमध्ये जर सगळे मराठे गेले तर असेही ते म्हणाले.
जरांगेला सगळे कंत्राट मॅनेज करुन दिले होते. 500 ते 900 कोटींचे कंत्राट तयार केले होते. एकाच माणसाला कंत्राट दिले जाईल असे कंत्राट तयार केलेत. पाटोद्याचे उपोषण सोडताना एका रुममध्ये बंद खोलीत विखे, पलांडे आणि जरांगे काय करत होते? असा सवाल बारस्कर यांनी केला. आंदोलनातून कंत्राटं चालतात, आम्ही हे चालू देणार नाही. सगळं डुप्लिकेट केलं, आणि कंत्राटं दिली आहेत असेही ते म्हणाले. विखे पाटील यांनी उद्ध्वस्त केलं असं जरांगे बोलले होते. आदल्या दिवशी शिव्या आणि दुसऱ्या दिवशी माफ करा, आधी बोलतो वाटोळं केलं आणि आता प्रेम करा बोलतो असे बारस्कर म्हणाले.
500 कोटी तुझ्या नावावर घेतले तर आधी का नाही बोलला?
500 कोटी तुझ्या नावावर घेतले तर आधी का नाही बोलला? असा सवाल बारस्कर यांनी केला. आधी का नाही उचकवलं तोंड, उत्तरं दे जमिनी कुठून आणल्या. भाजप नेत्यांनी दिलं बोलतो, जिरवण्यासाठी सगळं सुरु आहे. मी वकिलीचा विद्यार्थी आहे, प्रश्न असा असतो की समोरचा अडचणीत येणार. तुमची बायको तुम्हाला मारत होती, आता हाणते की नाही सांग. तसाच हा प्रश्न आहे, भाजपच्या नेत्याने शिंदेंना पैसे दिले, मग ते तुला दिले सगळं हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. मंत्र्याचा पुरावा दे, तुझी आणि नगरच्या मंत्र्यांची कुजबुज दाखव असेही ते म्हणाले.
नागात जसं विष असतं, तसंच याच्यात विष आहे
2029 ला पाडणार बोलतो. आरे पण आणणार कोणाला? असा सवाल बारस्करांनी केला. उद्या जरांगेंनी व्हीडिओ लावावे, बाकी काही लावू नये असेही ते म्हणाले. जरांगेची सवय आहे, नागात जसं विष असतं, तसंच याच्यात विष आहे. एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत होता की नाही हे सांगावं. हे सगळं सुपारी प्रकरण आहे, यापुढे काही बोलू शकत नाही. काल दोन चांगल्या गोष्टी केल्या, एक रडला नाही आणि दुसरं शिव्या दिल्या नाहीत. कायद्याचे राज्य आहे, संविधानाचे राज्य आहे. जरांगे यांचा भंपकपणा आहे. मराठवाड्यातील पोरांना सांगावं, पुतण्याने जमीन घेतली ती कशी, सांगायला तोंड नाही त्यामुळे तो गप्प आहे असेही ते म्हणाले.
तुझ्या पुतण्याच्या नावावर इतकी जमीन कशी? कुठून आल पैसे?
जरांगे फक्त सनसनाटी आरोप करतात. याआधी देखील आरोप केलेत, शंभूराज देसाई आल्यावर 100 कोटी माझ्या नावावर कोणी खाल्ले असे बोलले होते. आता कुठे गेले ते 100 कोटी. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री विष देऊन मारणार असे आरोप केले होते. फक्त सनसनाटी आरोप करत डायव्हर्जन करत आहे जरांगे असे बारस्कर म्हणाले. मी काही कानातली कुजबुज नाही सांगितली. जलसंपदा खात्याचे कंत्राट तुझ्या जवळ असलेला गलांड्या त्याला दिले याचे पुरावे मी दिले होते. मराठा समाजाला विकून मोठे होऊ नका. तुझ्या पुतण्याच्या नावावर इतकी जमीन कशी? सांगा उत्तर द्या कुठून आणले पैसे? करोडो रुपयांच्या जमिनी घेतल्या. उत्तरं द्या ना असेही बारस्कर म्हणाले.
जरांगेंचा धंदा गर्दी दाखवा, कंत्राट मिळवा असा आहे.
फॉर्म्युला द्या ना. दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना करोडोच्या जमिनी कशा घेतल्या? 21 वर्षांचा पुतण्या जमिनी घेतो. तुमचे लेकरं बाळं काय करत आहेत? मराठ्यांच्या पोरांचे भांडवल करतो असेही जरांगे म्हणाले. दोन वर्षांपूर्वी बोलला होता मंत्र्यांच्या कॉल रेकॉर्डिंग आहेत. ही पत्रकार परिषद दीड वर्षांची आहे, काॅल रेकॉर्डिंग आहे का नाही काढली ब्लॅकमेल करत होता का? असा सवाल बारस्करांनी केला. ओ ब्लॅकमेलर तू समाजाला फसवलं आहे. जरांगेंची लाभार्थी टोळी आहे, धनंजय दुफाके बघा, खेटून आहे जरांगेला बघा. दुफाके याच्या बहिणीने करोडो रुपयांची जमीन 23 लाख रुपये एकर घेतली आहे. 5 हेक्टर जमीन, दुफाकेच्या नातेवाईकांच्या नावावर जाते. येतात कुठून पैसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जरांगेंचा धंदा गर्दी दाखवा, कंत्राट मिळवा असा आहे.
जरांगे गर्दी गोळा करायला तू अनेक आमदारांच्या पाया पडला
जरांगे गर्दी गोळा करायला तू अनेक आमदारांच्या पाया पडला. गर्दी गोळा केलेली ती तुझी इज्जत वाचवण्यासाठी नाही शेवट आलेला आहे. मोबाइल क्रमांकाने लोकांचे भले होणार आहे का? असा सवालही त्यांनी केला. किती लबाडी करणार आहेस जरांगे. जरांगे तुझी लढाई कशासाठी होती? ओबीसी आरक्षणाचे काय झालं? 100 टक्के आरक्षण मिळालं बोलतो, तू जन्माला यायच्या आधी काय चाललं होतं? असा सवाल बारस्करांनी केला. हेच, नोंदी असेल तो ओबीसी नसेल तो एसईबीसी. 350 गोरगरीबांना पैसे वाट ना, आरक्षणाची लढाई विकली तू, जमिनी घेतल्या, मराठा समाजाला विकला तू असेही ते म्हणाले. मनोज जरांगे चालबाज माणूस आहे, शेतकरी संघटनांच्या लोकांना सोबत घेणार आणि आंदोलन करणार बोलत आहेत. 350 लोकं मारली ना तू, आरक्षणाचा मुद्दा संपला ना. जे कमावले आहे ना ते जिरवण्यासाठी सगळं चाललं आहे असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.