सांगली :- शहीद अशोक कामटे क्रीडा नगरी (पोलीस मुख्यालय मैदान, विश्रामबाग) येथे सुरू असलेल्या ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा चौथा दिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कोल्हापूर परिक्षेत्रातील ६ विविध घटकांमधील तब्बल ११५० पोलीस खेळाडूंनी या स्पर्धेत आपला क्रीडा नैपुण्याचा कस लावला आहे.
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पदकांची कमाई केली. उद्या दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी या क्रीडा महाकुंभेचा दिमाखदार समारोप होणार आहे.
क्रीडा प्रकारांमधील प्रमुख विजेते (दिवस चौथा)
आज झालेल्या रंगतदार स्पर्धांमध्ये खालील खेळाडूंनी घवदश यश संपादन केले:
५००० मीटर धावणे:
पुरुष गट: हर्षवर्धन दबडे (सातारा)
महिला गट: ऋतुजा कांबळे (पुणे ग्रामीण)
१०० मीटर अडथळा शर्यत (महिला गट): वैष्णवी शिंदे (सातारा)
११० मीटर अडथळा शर्यत (पुरुष गट): विशाल शिंदे (पुणे ग्रामीण)
ट्रिपल जंप (पुरुष गट): सी. एस. मर्डे (सातारा)
भालाफेक (Javelin Throw):पुरुष गट: अंकित पवार (पुणे ग्रामीण)महिला गट: रेखा नायकवाडे (सोलापूर ग्रामीण)पॉवरलिफ्टिंग: विविध वजनी गटांमध्ये पुरुष व महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच सांघिक खेळांमध्ये साखळी पद्धतीने सामने खेळवले जात असून, पुरुष व महिला गटातील उपांत्य फेरीचे सामने अत्यंत अटीतटीचे झाले. यासह कबड्डी महिला गटाच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने दिमाखदार विजय मिळवला आहे.
भव्य समारोप व पुरस्कार वितरण सोहळा
५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा सांगता सोहळा उद्या दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी १६:०० वाजेनंतर होणार आहे.
प्रमुख पाहुण्या: श्रीमती तेजस्विनी सावंत (प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रीडापटू)
अध्यक्षस्थानी: मा. श्री. रंजन कुमार शर्मा (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र)
प्रमुख उपस्थिती:
श्री. एम. राजकुमार (पोलीस आयुक्त, सोलापूर शहर)
श्री. निलोत्पल (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर)
श्री. निखिल पिंगळे (पोलीस अधीक्षक, सातारा)
श्री. अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण)
श्री. संदीपसिंग गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
क्रीडाप्रेमींना आवाहन:
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण आणि समारोप सोहळा नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. सांगलीकर क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.