कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी न्याय, स्वातंत्र्य आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण केले पाहिजे. विधी क्षेत्रात काम करताना फक्त कायद्याचे माहिती असणे पुरेसेनाही, तर न्यायाच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस आणि दुसऱ्याचे ऐकून घेण्याचा नम्रपणाही आवश्यक आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले.
बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ शनिवारी (१७ ऑक्टोबर) पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश सूर्य कांत उपस्थित होते. या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभाला सूर्य कांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांच्या गटाकडून विरोध झाला. हैदराबाद येथील विधी विद्यापीठातही असाच प्रकार घडला होता. याबद्दल सूर्य कांत यांनी भाष्य केले.
काही बाहेरच्या शक्तींकडून अस्थिरतेचा प्रयत्न
सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले, "आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की, या कार्यक्रमाच्या आधी खूप अडथळे आणि अडचणींचा निर्माण झाल्या. काही बाहेरच्या शक्तींमुळे अप्रत्यक्षपणे आणि दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. त्या त्या शक्तींनी अस्थिरत निर्माण केली होती. एक वेळ असे वाटू लागले होते की, हा कार्यक्रम जसे अपेक्षा आहे, तसा होईल की नाही."
"या सगळ्या अडचणी आणि आव्हानांनंतरही विद्यार्थ्यांनी आपल्या दृढ आत्मविश्वास दाखवून दिला आणि कार्यक्रमाच्या आयोजनात निर्माण झालेल्या अडचणींवर मात केली", असेही सरन्यायाधीश म्हणाले. प्रामाणिकपण राहण्याबद्दलची विद्यार्थ्यांची कटिबद्धता भविष्यात व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून देईन. मी केवळ तुमचे अभिनंदन करण्यासाठी नाही, तर तुमच्याकडून अनेक अपेक्षा बाळगूनही तुम्हाला बोलत आहे, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.