'देवाने अधिकार दिला, भाग्य मी लिहिलं, शिक्षा मीच दिली!' नाना पाटेकरांविरोधात तनुश्री दत्ताचा संताप अनावर; वक्तव्याने खळबळ!
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर बहुतेक जण शोक व्यक्त करत असताना अभिनेत्री तनुश्री दत्ता मात्र त्यांच्याविरोधात बोलताना दिसली. नाना जिवंत असताना त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्रीने त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर आरोप केले.
त्यांच्याबाबत नको नको ते बोलली. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली. ट्रोलिंगनंतर तनुश्रीने प्रत्युत्तर दिलं आहे.
तनुश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो जवळपास एक तासापेक्षा अधिक आहे. यात तनुश्रीने नानांविरोधातील आपली भूमिका कायम ठेवली आहे. तसंच आता ती वेगळंच काहीतरी बोलली आहे.
तनुश्री म्हणाली, "मला गाडलेले मुडदे काढायची गरज नाही. पण मला ट्रोलिंग केलं तर मी कितीही वाटेल तितके मुडदे काढायला तयार आहे. मला भीती वाटत नाही. लोक ट्रिगर होत आहेत कारण ते घाबरतात."
"ज्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, गुंडे पाठवून एन्झायटी दिली, माझं काम खराब केलं. तो एव्हिल डेड म्हणजे शैतान गेला. तो एकटा नाही तर शैतानांची झुंड आहे. नाना पाटेकर आणि त्यांच्या गुंडांनी माझ्या आयुष्यातील 4-5 वर्षे त्याने नरक करून ठेवली. त्याने माझं आयुष्य, करिअर माझं मानसिक आरोग्य बिघडवलं. देवाची कृपा माझी भक्ती, साधनेने मला सावरलं. मी बोलता बोलता बोलून गेले की मीडियाचं अटेन्शन इवेंटपेक्षा या मुद्द्यावर जास्त पण सुदैवाने तसं झालं नाही. पनवतीची काळी छाया माझ्या इवेंटवर पडली नाही. पण काळा आत्मा जाता जाताही मला ट्रोल करून गेला."
नानांविरोधात आणखी खूप काही बोलली तनुश्री
"त्याच्यावरील माझी टिपप्णी नाही तर तो माणूस अभद्र होता. माझ्या आयुष्यात जितके असुर होते त्याच्यात सगळ्यात मोठा असुर हा होता. त्याचा मृत्यू झाला असेल तर तो त्याच्या स्वत:च्या हाताने. त्याचा मृत्यू झाला आहे की नाही की तो पळण्याचा प्रयत्न करत आहे. मृत्यू झाला असेल तर खूप मोठा शैतान गेला. कारण दिशा सालियान प्रकरणाची खोल तपास सुरू आहे. दूरदूरपर्यंत याचं कनेक्शन असेल तर याचंही नाव नाव असावं."
"सिद्धी प्राप्त केलेल्या लोकांनी मला सांगितलं की माझ्यावर मारक क्रिया करत होता. स्वत:ची प्रतिमा राखायला त्याने कुणाचा मर्डरही केला असता. इतका मोठा रावण होता तो. पीआर ट्रोलिंग, शैतानांची कंपनी, सगळे मिळून माझ्या मागे पडले आहेत. त्यांची तांत्रिक क्रिया फेल ठरली कारण मी आता महाकालला आले आहे."
"...तर रावणाचीही पूजा करा"
"कुणाच्या मृत्यूनंतर त्याच्याबाबत वाईट बोलू नये असं जे सांगत आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे, की तुम्ही इतकी वर्षे आजही रावणाचा पुतळा जाळता ना, मग त्यालाही दरवर्षी श्रद्धांजली द्या. पूजाघरात रावणाचाही फोटो लावा. पूजाघरात रावणाचा फोटो लावा. त्याची पूजा करा. त्यावर मोठा हार घाला. रामाला ट्रोलिंग करा, तुम्ही त्याची हत्या का केली, तो तज्ञानी होता, वेदसंपन्न, शास्त्रसंपन्न होता, तपस्वी, तेजस्वी, महादेवाचे भक्त होते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही रामाचीही ट्रोलिंग कराल."
"देवाने मला अधिकार दिला, मी त्याचं भाग्य लिहिलं, त्याला शिक्षा दिली"
"माझ्या धर्माने मला शिकवलं, शैतान जिवंत असो वा मेलेला तो शैतानच राहतो. ज्याने आयुष्यभर शैतानी केली, कोणताही पश्चाताप केला नाही, माफी न मागताच तो गेला. मला देवाने त्याचं भाग्य लिहायचा अधिकार दिला होता, मी त्याला प्रेतलोकची शिक्षा दिली होती. प्रेतलोकही त्याच्यासाठी कमी, तो नरकात जायला हवा."
"देवाने मला जिवंत राहायला निवडलं आहे. देवासोबत माझं कनेक्शन, तो मला सांगतो तसं मी करते, तो सांगतो ते मी बोलते. मला फालतू, लो क्लास ग्रहावर राहण्यात काही रस नाही. पण मला देवाने कार्यासाठी पाठवलं आहे. माझ्या आत्म्याला त्याने निवडलं आहे. फालतू ग्रहावर, कचऱ्यात, चिखलात घुसून तिथं खत बनवणं ही माझी खासियत. मग मी त्यात झाडं लावते, अजून मी बीज टाकायला सुरुवात केलेली नाही. तिथून अध्यात्माचा एक वटवृक्ष वाढतो. त्याच्या शाखा पसरतात. त्यानंतर फळ फुलं येतात. धर्म, न्याय, माणुसकी, सृष्टीचे नियम, अध्यात्म फालुदा झाला आहे तिथं मला पाठवलं जातं. कारण तिथं माझ्यासारखी व्यक्ती असणं गरजेचं आहे. कारण ते दुसरं आणखी कुणी करणार नाही. जे कुणी करत नाही त्यासाठी देव मला पाठवतात. मी ते काम करूनही येतं."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.