🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई हायकोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! जजसाहेबांनी निकाल वाचना संपवला अन महिलेने पर्स... कोर्टरूम हादरली!

मुंबई हायकोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! जजसाहेबांनी निकाल वाचना संपवला अन महिलेने पर्स... कोर्टरूम हादरली!


मुंबई : सुनावणीदरम्यान निकाल विरोधात गेल्याने एका पक्षकार महिलेने चक्क न्यायालयात न्यायमूर्तीवर हातातली पर्स भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उच्च न्यायालयात घडला. घडलेल्या घटनेची तत्काळ दखल घेऊन न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून त्या महिलेला भर न्यायालयातून बाहेर काढले.





मुंबई उच्च न्यायालयाच्या क्रमांक ५४ दालनात हा धक्कादायक प्रकार घडला. न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर सुनावणीवेळी आदेश विरोधात गेल्याने अंधेरीस्थित मिंदर गुरमीत सिंग ठुकराल यांनी आपली पर्स न्या. जामदार यांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. लगेचच त्यांनी स्वतःला सावरले. मात्र, या घटनेने न्यायदालनात एकच खळबळ उडाली. या वेळी ठुकराल कुटुंबीयांसह न्यायालयात उपस्थित होत्या. घटनेनंतर त्यांनी त्वरीत लेखी माफीनामा सादर केला. 




मात्र, त्यांना न्यायालयातून बाहेर काढण्यात आले. माफीनाम्याने न्यायमूर्तीचे समाधान झाले नाही. त्यांनी संबंधित महिला पक्षकारावर दंड आकारण्याचे संकेत दिले आणि तिच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले. अत्यंत अयोग्य वर्तन केले असून ते न्यायालयाच्या अवमानास पात्र ठरते. सर्व प्रतिवादींच्या वर्तनाबाबतच्या या अवमान याचिकेची सुनावणी आता ३० ऑक्टोबरला सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दबावाला बळी पडणार नाही!

पक्षकारांना ते न्यायालयात काहीही करू शकतात असे वाटते? आपल्या विरोधात आदेश गेला म्हणजे तुम्ही असे वागणार का? अशी नाराजीही न्या. जामदार यांनी व्यक्त करून न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्याच वेळी पक्षकारांपर्यंत एक कठोर संदेश गेला पाहिजे, असे नमूद करून हे न्यायालय कोणत्याही भीतीला किंवा दबावाला बळी पडून कधीही कोणताही आदेश देणार नाही, अशी न्या. जामदार यांनी टिप्पणी केली.






➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.