🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश


सांगली : तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी, कसबे डिग्रज येथील डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, फलटण यांच्या वतीने असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (महाराष्ट्र शाखा) यांच्या सहकार्याने आयोजित ‘INNOPHARMA-2.0 – Think, Innovate & Transform’ या द्वितीय राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत हर्षदा सुनील मुधाळे आणि विवेक शशिकांत गायकवाड यांनी ‘VIDYATECH – Pharmacist AI Assistant’ हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या स्पर्धेत ५५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आणि एकूण २२० पोस्टर्स सादर करण्यात आली. या यशाबद्दल विद्यार्थ्यांना ₹७,००० रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

तसेच, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आंबप येथे जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ निमित्त आयोजित राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसीच्या श्रुती लालासो पाटील आणि आरती किरण कदम यांनी ‘Pharma Best From Waste’ हे पर्यावरणपूरक मॉडेल सादर करून द्वितीय क्रमांक मिळविला. या मॉडेलद्वारे टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून उपयुक्त वस्तू तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली. या यशाबद्दल विद्यार्थिनींना ₹२,००० रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. 

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. रावसाहेब पाटील, संस्थेचे संस्थापक प्रा. डी. डी. चौगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण वाडकर आणि डिप्लोमा विभागाचे HOD चंद्रकांत भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी संस्थेचे संचालक पोपटराव डोर्ले, अजितप्रसाद पाटील, मिलिंद भिलवडे, महावीर चौगुले, प्रशांत अवधूत, डॉ. बाळासाहेब चोपडे, अजित फराटे आणि नितीन चौगुले, सुदर्शन शिरोटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.