सांगली :- आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे प्रसिद्ध जकाई देवीचे दागिने आणि रोख रक्कम डकवणाऱ्या कुख्यात आंतरजिल्हा घरफोडी करणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.
या धडक कारवाईत पोलिसांनी ७ आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि २ मोटारसायकल असा एकूण ९,३९,४०० रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरीत्या जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी:
आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १९ जून २०२६ ते २२ जून २०२६ दरम्यान फिर्यादी रुक्मीणी बाळासाहेब भोसले (रा. नेलकरंजी) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले होते. तसेच बेडरुममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, जकाई देवीचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली होती. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची धडक कारवाई आणि सापळा:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनिय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने हलवली.
२९ ऑक्टोबर २०२६ रोजी LCB पथकातील पोलीस अंमलदार यांना गुप्त बातमी मिळाली की, नेलकरंजी येथील घरफोडीतील चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी काही इसम सांगली-कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेलच्या पाठीमागे, झुलेलाल मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर येणार आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून ७ संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांच्या জাळ्यात अडकलेले आरोपी:
चौकशीदरम्यान त्यांनी नेलकरंजी येथील घरफोडीची व जकाई देवीचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:आरबाज जैनुल मिराखान (वय २७, रा. सहारानगर, रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)बादशाह अल्हाबक्ष यमतनाळ (वय २६, रा. कबनूर दत्तनगर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)सोहेल महम्मद रफिक दड्डीकर (वय २८, रा. कबनूर दत्तनगर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)प्रमोद रावसो सव्वाशे (वय ३४, रा. आवळे चौक, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)शशीकांत अशोक दबडे (वय २७, रा. नेलकरंजे, ता. आटपाडी, जि. सांगली)विनायक सुनिल पाटील (वय २६, रा. सहारानगर, रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)विनोद रावसाहेब यादव (वय ३१, रा. व्हन्नूर, ता. कागल, जि. कोल्हापूर)(टीप: गुन्ह्यात सहभागी असणारे तबरेज खान, सदाम पठाण - दोघेही रा. इचलकरंजी आणि उमाजी गुजले - रा. बलगवडे हे तीन आरोपी परागंदा असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
चांदीचे दागिने: ८,४९,४०० रुपये किमतीचे ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे दागिने (यात छत्र, समई, घोडा, पाळणे, घंटा, किरीट, करंडा, पंचा आरती पात्र, पैंजण, तांब्या, तलवार, गणपतीची मूर्ती आणि चांदीची नाणी यांचा समावेश आहे.)
वाहने: ४०,००० रुपये किमतीची हिरो सी.डी. डिलक्स मोटारसायकल आणि ५०,००० रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड.
एकूण जप्त माल: ९,३९,४००/- रुपये.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली असून, पुढील तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.