किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्ताचे शुद्धीकरण (डिटॉक्स) करण्यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे आणि शरीरातील पाणी व मिनरल्सचे संतुलन राखण्याचे काम करतो. मात्र, जेव्हा किडनी योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही, तेव्हा शरीर विविध प्रकारचे संकेत देऊ लागते. यातील काही संकेत सगळ्यात आधी लघवीमध्ये दिसून येतात. सीके बिर्ला हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि युरोलॉजिस्ट डॉ. शलभ अग्रवाल यांच्या मते, जर लघवीमध्ये सतत काही असामान्य बदल दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. हे किडनीशी संबंधित एखाद्या गंभीर समस्येचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
१. लघवीत जास्त फेसाळणे
टॉयलेट करताना लघवीमध्ये वारंवार खूप जास्त फेसाळलेला भाग दिसत असेल आणि तो काही मिनिटांपर्यंत तसाच राहत असेल, तर हा शरीराबाहेर प्रोटीन गळती होण्याचा संकेत असू शकतो. सामान्यतः लघवीमध्ये प्रोटीन नसते. किडनीची फिल्टर करण्याची क्षमता कमजोर झाल्यावर प्रोटीन युरिनवाटे बाहेर पडू लागते.
२. लघवीच्या रंगात बदल होणे
लघवीचा रंग हलका पिवळा असणे सामान्य मानले जाते. परंतु, जर तो गडद पिवळा, तपकिरी, लाल किंवा गुलाबी दिसू लागला, तर ही चिंतेची बाब ठरू शकते. लघवीमध्ये रक्त येणे किंवा किडनीचा आजार असण्यामुळे रंगात असा बदल होऊ शकतो. अशा स्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
३. वारंवार लघवीला होणे
तुम्हाला अचानक आधीच्या तुलनेत जास्त वेळा लघवीला जावे लागत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी वारंवार उठावे लागत असेल, तर हे किडनीच्या समस्येचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. तथापि, यामागे इतरही आरोग्यविषयक कारणे असू शकतात, त्यामुळे योग्य तपासणी करणे गरजेचे ठरते.
४. लघवीचे प्रमाण कमी होणे
दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही जर लघवीचे प्रमाण खूप कमी होत असेल, तर किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्याचे हे लक्षण असू शकते. किडनीची कार्यक्षमता बिघडल्यास शरीरातील टाकाऊ पदार्थ योग्य रीतीने बाहेर पडू शकत नाहीत.
५. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे
लघवी करताना तीव्र किंवा वेदना किंवा कळ आल्यासारखं जाणवत असतील तर ते किडनीच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. जर हे लक्षण रोज दिसत असेल तर ते वेळीच ओळखून डॉक्टरांकडून योग्य ते उपचार घ्या. म्हणजे किडनीचा संसर्ग होण्याआधीच टाळू शकता.
६. लघवीमध्ये दुर्गंधी किंवा अस्पष्ट असणे
जर लघवी सामान्यपेक्षा जास्त दुर्गंधीयुक्त किंवा अस्पष्ट दिसत असेल, तर हा युनिट इन्फेक्शन्स किंवा किडनीशी संबंधित समस्येचा सिग्नल असू शकतो. अशी लक्षणे सतत आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हाडं अन् सांधेदुखीसाठी चुना खरोखरच गुणकारी आहे का? सकाळी रिकाम्या पोटी खाताना काय काळजी घ्यावी आणि योग्य पद्धत कोणती?
टीप: आरोग्याशी संबंधित कोणतीही असामान्य लक्षणे दीर्घकाळ जाणवत असल्यास सेल्फ-मेडिकेशन करणे टाळा आणि लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.