लग्नानंतर सारं काही सुरळीत सुरु होतं. संसार अगदी 16 वर्ष उत्तम सुरु होता. अचानक काहीतरी बिनसलं आणि पत्नी घर सोडून गेली. मात्र यानंतर नवऱ्याने निराशेत चक्क गाढवाशी लग्न केल्याचा प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. बायको परत नांदायला यावी म्हणून या व्यक्तीने गाढवासोबत प्रतिकात्मक लग्न केलं आहे. 16 वर्षांचा संसार तुटल्याने वैफल्यग्रस्त पिडीत पुरुषाने चक्क गाढवासोबत प्रतिकात्मकरित्या विवाह केला आहे.
दोन व्यक्तींवर केले आरोप
सोलापुरात बायको परत नांदायला यावी म्हणून गाढवाशी प्रतिकात्मक लग्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिपक सूर्यवंशी असं आहे. पत्नीने कुठलीही पूर्वकल्पना न देता सोडून गेली असल्याचा दावा दिपक सूर्यवंशीने केला आहे. दिपक सूर्यवंशीने त्याच्यात आणि पत्नीमध्ये मतभेद होण्यासाठी दोन व्यक्ती कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. मेव्हणे गणेश साळुंखे आणि मंगळवेढ्यातील माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी आपल्या बायकोला दूर केल्याचा आरोप दिपकने केला आहे. मागील 15 दिवसांपासून दिपक सूर्यवंशी बायको पूजा सूर्यवंशी ही परत यावी म्हणून प्रयत्न करतोय. त्यासाठी अखेर त्याने सोलापूर जिल्हा परिषद गेट समोर लक्षवेधी धरणे आंदोलन केलं.
गाढवासोबत प्रतिकात्मक लग्न
मात्र दिपक सूर्यवंशीच्या या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने त्याने सोमवारी थेट गाढवासोबत प्रतिकात्मक लग्न करून आगळे वेगळे आंदोलन केले. या आंदोलनाच्या ठिकाणी दिपक सूर्यवंशीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ही छायाचित्रं ठेवली होती. रीतसर मंगलाष्टक पार पडून गाढवाच्या गळ्यात पुष्पहार घालून दिपक सूर्यवंशीने हा प्रतिकात्मक विवाह केला आहे.
बॅनरवरील ओळींनी वेधलं लक्ष
पाच महत्त्वाचे मुद्दे मांडताना महाराष्ट्रामध्ये मुली लग्नासाठी भेटत नसल्याने मुलींच्या आई बापाची अपेक्षा फार मोठी असल्याने काही तरुण विना लग्नाचे 40 ते 45 वर्ष होऊन देखील त्यांचे लग्न होत नाही. आई बापाची अपेक्षा नोकरी, बूंगला, गाडी, शेती, शेतजमीन अशी असल्याने मुलगी भेटत नाही. मला 16 वर्षांपूर्वी देवाच्या कृपेने मुलगी भेटली. परंतु सोळा वर्ष मी तिच्यासोबत प्रमाणिकपणे संसार केला. कुठलंही कारण नसताना माजी नगरसेवक सोमेश यावलकर व माझा मेव्हणा गणेश साळुंखे यांच्या ऐकण्यावरुन माझ्या पत्नीने मला कुठलीही पूर्ण सूचना न देताना अचानकपणे सोडून दिल्याने माझ्या संसार मोडला. मी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे, असं या बॅनरवर म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.