🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​पुणे पदवीधर मतदारसंघ: "दिवाळीआधीच दिवाळी"! पदवीधरांच्या पाकिटांवर नेत्यांचा डल्ला; सुसाट पाकीटमारीमुळे शहरात खळबळ

​पुणे पदवीधर मतदारसंघ: "दिवाळीआधीच दिवाळी"! पदवीधरांच्या पाकिटांवर नेत्यांचा डल्ला; सुसाट पाकीटमारीमुळे शहरात खळबळ


​प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच पाकिटे गायब; नोंद नसलेल्या पदाधिकाऱ्यांनी मारला डल्ला ​पाकीटमारीची झाडाझडती होणार का? नामचीन पुढाऱ्यांचा सहभाग उघडकीस येणार का?

​
सांगली :- पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नावाने आलेल्या निधी आणि साहित्याची ऐन दिवाळीच्या तोंडावर काळाबाजार झाल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे. 

पदवीधरांच्या नावाखाली आलेली हजारो रुपयांची मदत किंवा पाकिटे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच, थेट पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यावर डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्यांचा पदवीधरांशी दूरदूरपर्यंत संबंध नाही आणि ज्यांची मतदार म्हणून कोणतीही नोंदणी नाही, अशा पक्षीय पदाधिकाऱ्यांनीच हा हातचलाखीचा खेळ खेळल्याचे बोलले जात आहे.

​पाकीटमारीचा 'सुळसुळाट', थेट खिशात माल!

​सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आलेल्या हजारो 'मुद्रा' (पाकिटे) एकाधिकारशाहीने वाटण्याऐवजी काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या घशात घातल्या गेल्या. ज्या खऱ्या पदवीधरांच्या नावावर ही पाकिटे मंजूर झाली होती, त्यांना अंधारात ठेवून परस्पर ती लांबवण्यात आली. ऐन सणासुदीच्या दिवसात स्वतःची तुंबडी भरण्यासाठी या मंडळींनी जणू "दिवाळीआधीच दिवाळी" साजरी केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 





​चर्चेला उधाण: नेमके पुढारी कोण?

​हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ज्यांच्या नावावर ही पाकिटे उचलण्यात आली, ती प्रत्यक्ष गरजवंतांपर्यंत न पोहोचता नेमकी कुणाच्या घशात गेली? याची आता शहरभर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. हा काळा बाजार करणाऱ्या पक्षाच्या त्या 'पदाधिकारी-पुढाऱ्यांचा' नेमका चेहरा समोर येणार का? असा सवाल आता सुज्ञ नागरिकांमधून विचारला जात आहे.

​झाडाझडती होणार का?

​पदवीधरांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या पाकीटमारांची आता पक्षश्रेष्ठी किंवा प्रशासकीय स्तरावर कठोर झाडाझडती घेतली जाणार का? यामध्ये नेमके कोण-कोणते बडे पुढारी सापडणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.