सांगली :- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उच्च्ररार तापवला आहे. जिल्ह्यातील बहुतांश जागांवर बिनविरोध वर्णी लागली असली, तरी जत सोसायटी गटातील लढतीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर आणि विनोद पवार यांच्यात होत असलेला हा थेट सामना आता केवळ सहकाराची निवडणूक राहिलेला नाही, तर तो राजकीय प्रतिष्ठेचा महामुकाबला बनला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने जतच्या मैदानात उतरलेल्या बड्या नेत्यांचा रुबाब, पाठीशी असणारा फौजफाटा आणि प्रचारात फिरणाऱ्या स्कर्पिओ, क्रेटासह अनेक महागड्या लक्झरी गाड्यांच्या चर्चांनी संपूर्ण सांगली जिल्ह्याचे डोळे दिपवून टाकले आहेत. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त याच हायप्रोफाइल लढतीची चर्चा रंगली आहे.
काय आहे जतच्या लढतीचे राजकारण?
सहकाराचा आखाडा अन् शक्तीप्रदर्शन: जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सत्ता आणि सहकारावर पकड प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद लावली आहे. गावागावातून फिरणाऱ्या महागड्या गाड्यांचा ताफा आणि होणारा खर्च पाहून सर्वसामान्य जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.
"जतचा हा रणसंग्राम म्हणजे केवळ दोन नेत्यांमधील लढत नसून, सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावरील वर्चस्वाची नवी दिशा ठरवणारी ही अटीतटीची कुस्ती ठरत आहे. या हायप्रोफाइल लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत!"
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला: राज्यभरात आपल्या तडाखेबंद भाषणांमुळे आणि राजकीय संघर्षांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत गटातून दंड थोपटले आहेत. त्यांच्या विरोधात विनोद पवार यांनी तगडे आव्हान उभे केल्याने हा सामना अतिशय अटीतटीचा बनला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.