🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"उपोषण सोडा, रस्त्यावर उतरून सरकारला गुडघ्यावर आणा! MPSC आंदोलनात राकेश टिकैतांचा सल्ला"

"उपोषण सोडा, रस्त्यावर उतरून सरकारला गुडघ्यावर आणा! MPSC आंदोलनात राकेश टिकैतांचा सल्ला"


आताचे सरकार निर्दयी आहे, त्यामुळे अन्नत्याग आंदोलनाने यश मिळणार नाही. पैलवान मैदानात उतरणार असेल तर सशक्त असले पाहिजे. यानुसार आंदोलन सुरू ठेवा. लंगर चालवून गुरू नानकदेव यांनी समाजात बदल घडवला.

तेव्हा खाऊन पिऊन लढा द्या. भीमनवार यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला.

एस. एम. जोशी पूल येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बेमुदत आंदोलनात शुक्रवारी (दि. ९) ते बोलत होते. टिकैत म्हणाले की, शेती तोट्यात नसते, तर तिला तोट्यात ढकलली जात आहे. कारण, व्यापाऱ्यांचा डोळा तुमच्या शेतीवर आहे. तेव्हा कुठेही नोकरी करा पण शेती विकू नका. विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना १३ महिने रस्त्यावर बसवून ठेवले. आम्ही ३० लाख लोक होतो.

माजी आयएएस कन्नन गोपीनाथन म्हणाले की, सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी आवाज दो, हम एक है... चा नारा बुलंद केला पाहिजे. स्वप्न आणि विश्वास या आधारे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत आहे. निरंजन टकले म्हणाले की, आज ४० हजार शाळांमध्ये मध्यान्ह भोजन बंद केले. याचा अर्थ एक कोटी मुले उपाशी ठेवत आहेत. सरकारला झुकवले जाते हे राकेश टिकैत यांनी दाखवून दिले. यूजीसी नोटिफिकेशन काढते की, कुलगुरू होण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील असण्याची गरज नाही. हे दुर्दैव आहे. सरकारला जागे करायचे असेल तर पुण्यातील सर्व रस्ते आंदोलनांनी व्यापले पाहिजेत. पुणे म्हणजे प्रेम आणि पुणे म्हणजे संघर्ष असे सूत्र मांडा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.