🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मटका माफियाचा राडा! व्हीआयपी दर्शनावरून मोठा गदारोळ; आमदाराच्या P.A. मुळे तुळजापुरात खळबळ!

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मटका माफियाचा राडा! व्हीआयपी दर्शनावरून मोठा गदारोळ; आमदाराच्या P.A. मुळे तुळजापुरात खळबळ!


तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव सुरू असतानाच धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर येथील कथित मटका व्यावसायिकाने तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेत फोटोसेशन केल्याचा आरोप करण्यात आलाय.

सामान्य भाविकांना गाभाऱ्यात प्रवेशबंदी असताना संबंधित व्यक्तीला व्हीआयपी दर्शन कसं देण्यात आलं? असा सवाल उपस्थित केला जातोय. या प्रकरणातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, भोपे पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेमके घडले काय?

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात राज्यभरातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत असतात. सामान्य भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असताना, काही व्यक्तींना थेट गाभाऱ्यात प्रवेश कसा दिला जातो, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.  भोपे पुजारी मंडळाने दिलेल्या तक्रारीनुसार, सोलापूर येथील अरुण प्रभाकर रोडगे ऊर्फ दादा रोडगे या कथित मटका व्यावसायिकाला तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. संबंधित व्यक्तीने गाभाऱ्यात दर्शन घेत फोटोसेशन केल्याचा आरोपही करण्यात आलाय.
दरम्यान,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत कारवाईची मागणी केलीय.सामान्य भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असताना,काही व्यक्तींना विशेष प्रवेश कसा असा सवाल उपस्थित केला जातोय. सोलापूर येथील अरुण प्रभाकर रोडगे ऊर्फ दादा रोडगे या कथित मटका व्यावसायिकाला महंत वाकोजीबुवा यांच्या माध्यमातून आमदार पाटील यांचे स्वीय सहायक सुधीर जमदाडे आणि नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांच्या मदतीने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत चौकशीची मागणी केली आहे. सामान्य भाविकांसाठी एक नियम आणि काही व्यक्तींसाठी दुसरा नियम आहे का, असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे. आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करणार का आणि संबंधित आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.