🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर अश्लील व्हिडीओचा धमाका; प्रकरण अंगलट येताच PI ने हेड कॉन्स्टेबलशी उरकलं लग्न!

पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर अश्लील व्हिडीओचा धमाका; प्रकरण अंगलट येताच PI ने हेड कॉन्स्टेबलशी उरकलं लग्न!


बिजनौर : तीन दिवसांपूर्वी, बधापूर पोलीस ठाण्याच्या ग्रुपमध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले. या प्रकरणातील निलंबित इन्स्पेक्टर नीरज तोमर यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले आहे. मात्र अश्लील व्हिडिओमुळे लोक आपला छळ करत असल्याचा आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील, एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी बधापूर पोलीस ठाण्याच्या ग्रुपमध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केला होता. हा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्यामुळे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांना निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक पथक तयार करत चौकशी अहवाल मिळाल्यानंतर निलंबनाची कारवाई सुरु केली. मात्र हा आक्षेपार्ह व्हिडिओ ग्रुपवर शेअर केल्यानंतर लगेचच व्हिडिओ डिलीट करण्यात आला, पण तोपर्यंत काही पोलीस अधिकाऱ्यांनी तो डाउनलोड करून त्याचे स्क्रीनशॉट घेतले होते.

दरम्यान या घटनेतील निलंबित इन्स्पेक्टर नीरज तोमर यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले आहे. लग्नानंतर, दोघांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून काही लोक आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक ३२ सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याने काही लोक तिचा एक खोटा व्हिडिओ प्रसारित करत बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. 



शुक्रवारी, निलंबित इन्स्पेक्टर नीरज तोमर यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केलं आहे. मात्र हे लग्न मानसिकरित्या झालं असून काही अडचणींमुळे त्यांचे अद्याप कायदेशीर लग्न झालेले नाही, असेही तिने सांगितले आहे. तथापि, या बदनामी प्रकरणी इन्स्पेक्टर नीरज तोमर यांनी मोरादाबाद जीआरपीमध्ये तैनात असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.