🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाप पान टपरीवर राबला, बहिणीच्या पुस्तकांनी हात दिला; गरिबीवर मात करत लेक थेट न्यायमूर्ती पदावर आरूढ!

बाप पान टपरीवर राबला, बहिणीच्या पुस्तकांनी हात दिला; गरिबीवर मात करत लेक थेट न्यायमूर्ती पदावर आरूढ!


भारतात अनेकदा घरची जबाबदारी आणि लग्न हे मुलींच्या स्वप्नांच्या आड येतं. कानपूरची निशी गुप्ता ही देखील अशीच एक मुलगी पण फरक एवढाच होता की, समाजाच्या टोमण्यांमध्ये आणि यशात तिचे वडील भक्कमपणे भिंत बनून उभे होते. म्हणूनच निशीची ही यशोगाथा विपरीत परिस्थितीतही पुढे जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या देशातील मुलींसाठी एक उत्तम उदाहरण आहे.


निशी गुप्ता ही उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. तिचं संगोपन एका सर्वसामान्य कुटुंबात झालं. तिचे वडील पान टपरी चालवतात. निशीचं बालपण आर्थिक चणचणीत गेलं, जिथे शाळेची फी भरणं आणि पुस्तकं खरेदी करणं हे देखील मोठं आव्हान होतं. तिने आपलं शालेय शिक्षण कानपूरमधूनच पूर्ण केलं.

निशीने अलाहाबाद विद्यापीठातून एलएलबी (LLB) आणि एलएलएम (LLM) ची पदवी मिळवली. निशी तिच्या कुटुंबातून कायदेशीर क्षेत्रात (Legal Field) जाणारी पहिली व्यक्ती ठरली. तिच्या कुटुंबात कोणाचीही कौटुंबिक पार्श्वभूमी कायद्याची नव्हती, त्यामुळे तिने आपल्या कष्टाच्या जोरावर स्वतःचा मार्ग स्वतः तयार केला. 




निशी अशा समाजात राहते जिथे बारावी शिकवल्यानंतर मुलीचं लग्न करून दिलं पाहिजे, असा समज आहे. निशीच्या मोठ्या बहिणीच्या बाबतीतही असंच झालं होतं. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. परंतु लहान मुलीला शिकवण्यासाठी वडिलांनी प्रत्येक टोमण्याकडे दुर्लक्ष केलं. समाजाचा दबाव आणि नातेवाईकांचे टोमणे सहन करूनही त्यांनी मुलीला पुढे जाण्यासाठी पूर्ण वेळ दिला.



आर्थिक विवंचनेमुळे पुस्तकं खरेदी करणं देखील निशीसाठी एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं. तिला तिच्या बहिणीच्या जुन्या पुस्तकावरून अभ्यास करावा लागत असे. तयारीच्या काळात तिने एका स्टडी पार्टनरसोबत मिळून अभ्यास केला, ज्याने तिला कधीही न खचण्याची ताकद दिली. निशीच्या मते, Judiciary Exam साठी '३-आर' (3-R) फॉर्म्युला सर्वात प्रभावी आहे - रिपीटेशन, रिटेंशन आणि रिप्रॉडक्शन्स. तिने तिची इंग्रजी सुधारण्यासाठी देखील खूप मेहनत घेतली, जेणेकरून तिला कायद्यातील कठीण शब्द चांगल्या प्रकारे समजतील.



न्यायाधीश होण्याचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. निशीने मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पीसीएस-जे परीक्षा दिल्या आणि मुलाखतीच्या फेरीपर्यंत पोहोचली. मात्र एका-दोन गुणांच्या फरकामुळे तिची निवड झाली नाही. तरीही तिने हार मानली नाही. आपल्या चुका सुधारल्या आणि यूपी पीसीएस-जे २०२२ च्या परीक्षेत पहिली रँक पटकावली. संपूर्ण राज्यात टॉप करून तिने आपल्या वडिलांचं नाव अभिमानाने उंचावलं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.