खासगी क्षेत्रातील प्रमुख टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आइडियाने (Vi) भारतीय बाजारात ग्राहकांसाठी अगदी खिशाला परवडणारे नवीन रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटर 'ट्राय' (TRAI) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत, एअरटेलनंतर आता Vi ने देखील फक्त कॉलिंगची सुविधा देणारे (Voice-Only Plans) नवीन प्लान सादर केले आहेत.
अनेक मोबाइल वापरकर्त्यांना इंटरनेट डेटाची गरज नसते, अशा ग्राहकांसाठी हे प्लान अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. Vi ने एकूण ६ नवीन रिचार्ज प्लान लाँच केले असून, याची सुरुवातीची किंमत फक्त १७९ रुपयांपासून सुरू होते आणि यामध्ये वर्षभराची (३६५ दिवस) वैधता देणारा प्लान देखील समाविष्ट आहे. वोडाफोन-आइडियाच्या या नवीन रिचार्ज प्लान्सची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-
Vi चा १७९ रुपयांचा रिचार्ज प्लान
Vi च्या या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत १७९ रुपये आहे. हा प्लान २५ दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना एकूण ३०० एसएमएस आणि 'Vi Movies & TV' ॲपचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जाते.
१८५ रुपयांचा रिचार्ज प्लान
या प्लानची किंमत १८५ रुपये असून, यात २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि 'Vi Movies & TV' ॲपचा मोफत एक्सेस मिळतो.
२०३ रुपयांचा रिचार्ज प्लान
Vi ने २०३ रुपयांचा प्लान देखील आणला आहे, ज्यामध्ये पूर्ण ३० दिवसांची वैधता मिळते. या प्लानसह युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि Vi च्या करमणूक ॲपचा लाभ घेता येतो.
२०६ रुपयांचा रिचार्ज प्लान
महिन्याभराच्या वैधतेसाठी २०६ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. यातही पूर्ण महिन्याभराची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसची सुविधा मिळते. यासोबतच Vi ॲपचा कॉम्प्लीमेंट्री एक्सेस देखील दिला जातो.
४७० रुपयांचा रिचार्ज प्लान
जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्यापासून सुटका हवी असेल, तर ४७० रुपयांचा प्लान उत्तम पर्याय आहे. हा प्लान तब्बल ८४ दिवसांच्या (सुमारे ३ महिने) वैधतेसह येतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ९०० एसएमएसची सुविधा मिळते.
Vi चा १८४९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लान
ज्या ग्राहकांना वर्षभर रिचार्जच्या कटकटीपासून लांब राहायचे आहे, त्यांच्यासाठी Vi ने १८४९ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या वार्षिक प्लॅनमध्ये तब्बल ३६५ दिवसांची (वर्षभर) वैधता मिळते. यात संपूर्ण वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएसचा लाभ दिला जातो.१७९ रुपयांचा रिचार्ज प्लान१८५ रुपयांचा रिचार्ज प्लान
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.