Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 8 हजारांनी वाढ, कोरोनाबळी मात्र घटले

 देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 8 हजारांनी वाढ, कोरोनाबळी मात्र घटले

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत आठ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 45 हजार 951 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 817 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. 

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 45 हजार 951 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 817 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 60 हजार 729 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 3 लाख 62 हजार 848 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 27 हजार 330 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 98 हजार 454 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 37 हजार 64 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 33 कोटी 28 लाख 54 हजार 527 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण - 45,951

देशात 24 तासात डिस्चार्ज - 60,729

देशात 24 तासात मृत्यू - 817

एकूण रूग्ण - 3,03,62,848

एकूण डिस्चार्ज - 2,94,27,330

एकूण मृत्यू - 3,98,454

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - 5,37,064

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या - 33,28,54,527

एका दिवसातील लसीकरण - 36,51,983


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.