Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मस्तवालांची मस्ती सांगलीत उतरवून मिळेल" सांगलीकरांमध्ये चर्चा; सिंघम अधिकाऱ्याचा बेताल टिल्ल्याला चांगलाच टोला

"मस्तवालांची मस्ती सांगलीत उतरवून मिळेल"  सांगलीकरांमध्ये चर्चा; सिंघम अधिकाऱ्याचा बेताल टिल्ल्याला चांगलाच टोला
 

सांगली : मुंबईतल्या बंगल्यावर बॉस बसला आहे म्हणत नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांनाच बदल्यांची धमकी देणाऱ्या टिल्ल्याला एका सिंघम अधिकाऱ्याने चांगलाच दणका दिला. याची बातमी माध्यमांमध्ये व्हायरल होताच या सिंघम अधिकाऱ्याचे केवळ जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्याकडून अभिनंदन होत आहे. या घटनेमुळे "मस्तवालांची मस्ती सांगलीत उतरवून मिळेल" अशी चर्चाही आता सांगलीकरांमध्ये चांगलीच रंगली आहे. कार्यकर्त्यांवर रूबाब झाडण्यासाठी बेताल पोलिस दल आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या टिल्याला या सिंघम अधिकाऱ्याने दिलेल्या टोल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष आणि भूमिका बदलणाऱ्या बाप-लेकांची थेरं अवघा महाराष्ट्र पाहतो आहे. आमचा बॉस मुंबईतील "सागर" किनारी असलेल्या बंगल्यात बसल्याने हम करे सो कायदा असा गैरसमज बाप-लेकांचा झाला असावा अशीही सांगलीकरांमध्ये चर्चा आहे. सध्या या बाप-लेकांना कधी नव्हे इतका काही लोकांचा पुळका आला आहे. त्यात या टिल्याने यापूर्वी पोलिसांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर कोणीच कारवाई न केल्याने या दीड फुट्याचे धाडस चांगलेच वाढले होते. त्याच अविर्भावात तो सांगली जिल्ह्यात रूबाब करायला आला होता. त्यावेळी त्याने पुन्हा पोलिसांना असंसदीय भाषा वापरण्याचा प्रयत्न केला. 

टिल्याच्या या सततच्या वर्तणुकीचा राग संपूर्ण पोलिस दलाच्या मनात खदखदत आहे. मात्र त्याला वाट सांगलीत फुटली. टिल्याच्या अभद्र वक्तव्यानंतर तेथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यामधील सिंघम जागा झाला. त्याने तेथेच त्याच्याच कार्यकर्त्यांसमोर टिल्याचा चांगलाच पाणउतारा केला. शिवाय तुझ्यासारखे लय बघितल्यात असा दमच भरला. चारचौघात सिंघम अधिकाऱ्याकडून प्रतिउत्तर मिळाल्याने टिल्याचा चेहरा चांगलाच पाहण्यासारखा झाला होता. ही बातमी जिल्ह्यासह राज्यात वाऱ्यासारखी पसरली. काही माध्यमांनी या सिंघम अधिकाऱ्याला तर डोक्यावरच घेतले. त्यानंतर मस्तवालांची मस्ती सांगलीतच उतरून मिळेल अशी चर्चा सांगलीकरांमध्ये सुरू झाली. 

एकंदरीत राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या क्रांतिकारी सांगली जिल्ह्यातून टिल्याचा माज उतरवल्याने सिंघम अधिकाऱ्याचे केवळ खात्यातील लोकांकडूनच नव्हे सांगलीकर आणि राज्यातील जनतेकडून अभिनंदन केले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.